मुंबई

विशेष उपचारांमुळे यशस्वी गर्भधारणा, दिला निरोगी बाळाला जन्म

CD

पीसीओडीग्रस्त महिलेची यशस्वी गर्भधारणा
दुर्मिळ समस्यांवर मात करत दिला निरोगी बाळाला जन्म
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (पीसीओडी) आणि अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या इम्यून थ्रॉम्बोसाइटोपेनिक पर्पुरा (आयटीपी) या दुहेरी समस्यांनी ग्रस्त असलेल्या ३२ वर्षीय महिलेने विशेष उपचारांमुळे यशस्वी गर्भधारणा करत एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे.
महिलेला पीसीओडीसोबत आयटीपी ज्यात रोगप्रतिकारक प्रणाली प्लेटलेट्सवर हल्ला करते, ही दुर्मिळ स्थिती होती. ज्यामुळे गर्भावस्थेत आई आणि बाळाला रक्तस्रावाचा धोका वाढतो. या महिलेला हार्मोनल असंतुलन, अनियमित अंडोत्सर्जन, छोटा सबसेरोसल फायब्रॉइड या समस्याही होत्या. गुंतागुंतीची वैद्यकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन, बहुविशेषज्ञ वैद्यकीय समन्वय पथकाने नियोजित सिझेरियन सेक्शनचा निर्णय घेतला. प्रसूतीनंतर कमी झालेल्या रक्तपेशींसाठी इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले. विशेष उपचारांच्या यशामुळे आई आणि बाळ दोघांनाही काही दिवसांपूर्वी रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
..............................
स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ. गंधाली देवूरुखकर यांनी सांगितले की, पीसीओडी आणि आयटीपीसारख्या गुंतागुंतीच्या स्थितींमध्ये योग्य हार्मोनल थेरपी, वेळेवर हस्तक्षेप आणि सतत देखरेख यांमुळे सुरक्षित गर्भधारणा आणि प्रसूती शक्य होते. सिझेरियन सेक्शनसाठी किमान ५० × १०⁹/L रक्तपेशींची संख्या आवश्यक मानली जाते, तर एपिड्युरल भूलसाठी ती ८० × १०⁹/L पर्यंत असणे आदर्श ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: कसोटीबाबत तळमळ; पण... टी-२० स्पेशालिस्ट सूर्यकुमार यादवचे पारंपरिक क्रिकेटबाबत मत

Shri Guru Paduka Darshan Mahotsav : श्रीगुरू पादुका दर्शन महोत्सवाची उत्कंठा,स्वामी स्वरूपानंदांच्या हस्ते शनिवारी उद्‍घाटन, गुरू श्री एम यांचे रविवारी व्याख्यान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

SCROLL FOR NEXT