बॅरिएट्रिक सर्जरीत विम्याची अडचण कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : लठ्ठपणावर होणाऱ्या बॅरिएट्रिक आणि मेटाबॉलिक सर्जरीसाठी विमा कव्हरेज मिळवण्यात भारतीय रुग्णांना आजही मोठ्या अडचणी येत असल्याचे ओबेसिटी अँड मेटाबॉलिक सर्जरी सोसायटी ऑफ इंडियाच्या (ओएसएसआय) सर्वेक्षणातून उघड झाले आहे. २०१९ मध्ये आयआरडीएआयने विमा कव्हर अनिवार्य करूनही, ९५.४ टक्के सर्जन्सनी विमा मंजुरीतील विलंबामुळे उपचार पुढे ढकलले जात असल्याचे नमूद केले. ६९.७ टक्के सर्जन्सनी ही प्रक्रिया ''खूप गुंतागुंतीची'' तर ९१.७ टक्के जणांनी वेळखाऊ असल्याचे सांगितले. या सर्जरीमुळे मधुमेह, हृदयरोग आणि स्लीप एपनियासारख्या गंभीर आजारांवर प्रभावी उपचार मिळतो; मात्र विलंबाने रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. ओएसएसआयने वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे आणि विमा निकषांतील तफावत तातडीने दूर करण्याची मागणी केली आहे, तसेच टाईप-२ मधुमेहासाठीही मेटाबॉलिक सर्जरीला कव्हर देण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.