मोक्षधाम स्मशानभूमी
सोमवारपासून बंद
डोंबिवली, ता. २८ ः डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर परिसरालगत असलेली ‘मोक्षधाम’ स्मशानभूमीचे नूतनीकरण केले जाणार आहे. त्यामुळे स्मशानभूमी सोमवार (ता. १) पासून बंद ठेवली जाणार आहे. शहरातील ही एकमेव मोठी स्मशानभूमी असून विविध परिसर तसेच ग्रामीण भागातील नागरिक याचा वापर करतात.
केडीएमसी क्षेत्रातील ३६ स्मशानभूमींपैकी काही स्मशानभूमींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. डोंबिवलीमधील दत्तनगर व पाथर्ली या दोन ठिकाणच्या स्मशानभूमी या सर्वाधिक वापरल्या जातात; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून देखभाल दुरुस्ती व्यवस्थित न झाल्याने दत्तनगर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता तसेच वाढत्या लोकसंख्येनुसार केडीएमसीने नवीन स्मशानभूमी उभारणी आणि जुन्या ठिकाणांचे नूतनीकरण सुरू केले आहे.
.........................................
डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखाण पाडा, पूर्वेकडील पाथर्ली स्मशानभूमी (गॅस शवदाहिनीसहित) यांचे आधुनिकीकरण पूर्ण झाले असून ठाकुर्ली समांतर रस्त्यावर आणि कोळेगाव येथे नव्या स्मशानभूमी उभारल्या गेल्या आहेत. पाथर्लीतील नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दत्तनगर स्मशानभूमीचे काम हाती घेण्यात येत आहे. नूतनीकरण पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या काळात नागरिकांनी पर्यायी स्मशानभूमींचा वापर करावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
.................................
पर्यायी स्मशानभूमी
पाथर्ली स्मशानभूमी (गॅस शवदाहिनी उपलब्ध)
ठाकुर्ली- म्हसोबा चौक स्मशानभूमी
चोळेगाव स्मशानभूमी
कुंभारखाण पाडा (गॅस शवदाहिनी उपलब्ध)
मोठागाव स्मशानभूमी
जुनी डोंबिवली स्मशानभूमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.