मुंबई

जव्‍हारमध्ये १११ काेटी लाटण्याचा डाव उधळला

CD

जव्‍हारमध्ये १११ काेटी
लाटण्याचा डाव उधळला

बॅँकेच्या सतर्कतेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात आर्थिक घाेटाळा टळला

जव्हार, ता. २८ (बातमीदार) ः शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सतर्कतेमुळे जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही कर्मचारी आणि ठेकेदारांचा कोट्यवधी रुपये निधी हडपण्याचा कट उधळला गेला असून १११ कोटी रुपयांचा गैरव्‍यवहार टळला आहे. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभागातील काही विभागीय कर्मचारी आणि अधिकारी यांची अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध ठेकेदारांची अनामत रक्कम जमा असल्याच्या खात्यातून डिमांड ड्राफ्ट बनवण्यासाठी देण्यात आलेल्या १११.६५ कोटी रुपयांच्या चेकविषयी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जव्हार शाखेच्या अधिकाऱ्याला संशय आल्याने कोट्यवधींचा निधी लाटण्याचा प्रकार टळला. दरवर्षी या विभागांतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. काम देताना ठेकेदार अनामत रक्कम जमा करतात. ही रक्कम सर्वसाधारणपणे संबंधित कामाच्या एक ते दोन टक्का, तर विशिष्ट कामांत ती पाच टक्क्यांपर्यंत जमा केली जाते. विकासकामे झाल्यानंतर अनामत रक्कम पुन्हा घेण्यास ठेकेदारांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे निरुत्साह असतो. त्यामुळे बँक खात्यात जमा असलेल्या या रकमेवर मोठ्या प्रमाणात व्‍याजही जमा झाल्याचे समजते.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जव्हार शाखेने सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांना ईमेलद्वारे चेकचा तपशील व इतर माहिती दिली आहे. हा चेक आपल्या विभागाला देण्यात आलेल्या चेकबुकमधील क्रमानुसार आहे का, याची शहानिशा तथा तपासणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच त्यावरील स्वाक्षऱ्या खऱ्या अथवा खोट्या असल्याची पडताळणी करून आवश्यकता भासल्यास पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात येणार आहे, असे विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी ‘सकाळ’ला माहिती देत सांगितले.

असा उघड झाला गैरप्रकार?
जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्याने १११ कोटी ६३ लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट काढण्यासाठी चेक आणि आवश्यक स्लिप जव्हारच्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केली. इतक्या मोठ्या रकमेच्या डिमांड ड्राफ्टमुळे बॅँक अधिकाऱ्याला संशय आला. त्यामुळे त्यांनी हा डिमांड ड्राफ्टसाठी दिलेल्या चेकच्या स्वाक्षऱ्या आणि इतर बाबी तपासणी व पडताळणीसाठी सारणी बांधकाम विभाग कार्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आपण हा चेक दिला नसल्याचे स्पष्‍ट केले आणि हा प्रकार उघड झाला.
----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टातल्या टायपिस्टला ४ जॅकेट अन् तासाला १ हजार दिले, AI वापरून याचिका; १२वी पास तरुणाला सरन्यायाधीशांनी झापलं

भारताला जेतेपदाच्या हॅट् ट्रिकची संधी! T20 World Cup 2028 साठी १२ संघ पात्र, कसा असेल उर्वरित ८ जागांसाठीचा मार्ग?

छत्रपती संभाजीनगर हादरलं! ठाकरे गटाच्या उपतालुका प्रमुख कृष्णा राठोड यांच्यावर मध्यरात्री चाकू हल्ला

'तन्वी प्रत्येक भांडणाआधी जाणीवपूर्वक स्मोक करून यायची' बिग बॉसच्या घराबाहेर पडताच रुचिताचा मोठा खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

SCROLL FOR NEXT