खैर लाकडाने भरलेला ट्रक जप्त
वाडा, ता. २८ ः गुजरात येथून चिपळूणकडे बेकायदा वाहतूक होत असलेला खैर या लाकडाने भरलेला ट्रक जप्त करण्यात आला. हा ट्रक मुंबई- अहमदाबाद महामार्गावरील चारोटी मनोरच्या हद्दीत आढळून आला. ट्रकमध्ये १५ टनांपेक्षा अधिक सोलीव खैर लाकूड जप्त करण्यात आले असून वाहनचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास घडली. वाडा दक्षता पथकाने केलेल्या या कारवाईमुळे खैर तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.