मुंबई

पैशाचं वाटप करून निवडणूक जिंकणं हे चुकीच - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

CD

पैशाच्या वाटपाने निवडणूक जिंकणे चुकीचे
नीलेश राणे यांनी चुकीचे केले नाही; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : पैशाच्या आमिषाने निवडणुका जिंकता येत नाहीत, विकासकामे करून लोकांचे मन जिंकावे लागते. पैसे वाटणे आणि पैशाचे वाटप करून निवडणूक जिंकणे हे चुकीचे असल्याचे मत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. तसेच नीलेश राणे यांनी चुकीचे केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी (ता. २८) राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ‘अक्षतांजली’ स्मृती सोहळ्याचा आरंभ करण्यात आला. त्या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरनाईक यांनी हे मत व्यक्त केले.
‘कार्यकर्त्यांच्या घरात मतदारांना आमिष दाखवून २५ लाख रुपयांचे वाटप सुरू असल्याचे नीलेश राणेंना कळाले असेल. त्यांनी ते उघड केल्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत राहतात, पण लोकप्रतिनिधींच्या घरी जाऊन पोलिसांनी झडती घेणे योग्य नाही. आमदारांच्या घरी जात असताना विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेऊन जावे लागते, परंतु जर असे होत नसेल तर ते चुकीचे असल्याचे सरनाईक यांनी या वेळी सांगितले. हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आरोपवर बोलताना सरनाईक म्हणाले, की कोणाला गजनी बोलण्यापेक्षा काँग्रेस स्वतःच अस्तित्व विसरलेली आहे. काँग्रेसचे नेते सगळ्या महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे गजनी आहेत. राज्यामध्ये नगर परिषदेमध्ये अनेक उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत. विजय वडेट्टीवार यांनी तिकडे जाऊन वल्गना कराव्यात. काँग्रेसची लोकं कुठे प्रचार करताना दिसतच नसल्याचा टोलादेखील सरनाईक यांनी लगावला.
............................................
फडणवीस आणि शिंदेंमुळे ठाकरे बंधू एकत्र
भावाभावांमध्ये आपुलकीचे नाते आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये त्यांचा दुरावा होता. त्यामुळे ते एकमेकांना भेटले म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण आहे, असं काही समजू नये. ठाकरे बंधू यांचे कुटुंब एकत्र करण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंनी त्यांचे आभार मानायला हवेत, असेही सरनाईक म्हणाले.
.....................................
विकास म्हणजे सतीश प्रधान असे चित्र या ठाण्याचे होते. प्रधान यांच्या पावलावर पाऊल ठेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी आज ठाण्याचा विकास कसा गतीने करता येईल यासाठी प्रयत्न करीत आहोत. सतीश प्रधान यांचे उपकार ठाणेकर कधीही विसरू शकणार नाहीत. दादोजी कोंडदेव स्टेडियम ते गडकरी रंगायतनपर्यंत हा विकास सतीश प्रधान यांच्या काळात झालेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शहरात विकासाची कामे आम्ही करीत असल्याचे सरनाईक यांनी बोलताना स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"संजूने तुझी जागा घेतली म्हणून..."; Shubman Gill ने मुद्दाम टीम इंडियाच्या फोटोतून संजूला क्रॉप केल? नेटिझन्सकडून आरोप, एकाने तर...

Jejuri History : येळकोट येळकोट जय मल्हार! १५० वर्षांपूर्वीचा जेजुरी गड कसा होता? खंडोबा मंदिराचा इतिहास अन् दुर्मिळ छायाचित्रे पाहा

Wagholi Fire : वाघोलीत फर्निचर कारखान्याला आग; कारखाना जळून खाक, कोट्यवधीचे नुकसान

रोहित शर्मा, राहुल द्रविड यांच्या शैलीचं क्रिकेट T20 World Cup 2026 मध्ये चालणार नव्हते... सूर्यकुमार यादवचे स्पष्ट मत

Malegaon News : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार; अजित दादांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी स्वीकारली जबाबदारी

SCROLL FOR NEXT