मुंबई

शिंदेच्या बालेकिल्ल्यातच जनता-दरबाराची घोषणा; गणेश नाईकांचा थेट इशारा

CD

बदलापूर-अंबरनाथ ‘दत्तक’ घेण्याची घोषणा
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबाराचे आयोजन; गणेश नाईकांचा इशारा

अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर)ः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद शिगेला पोहोचला असून, अंबरनाथमध्ये शुक्रवारी (ता. २८) झालेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री नाईक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. पालघर जिल्ह्यातील चार नगरपालिका तसेच बदलापूर, अंबरनाथ या नगर परिषदांवर भाजपचीच सत्ता येणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

‘प्रेमाने सांगितले तर सहन करतो, गाडीत अडचण झाली तरी सहन करतो; पण कोणी बाप होण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याचा बाप दाखवू,’ असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी विरोधकांना लगावला. नाईक यांनी पुढे म्हणाले, की युतीतील किंवा विरोधी पक्षातील कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आता अंबरनाथ आणि बदलापूर मी ‘दत्तक’ घेणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले. मंत्री हा राज्याचा असतो; तो एका जिल्ह्याचा किंवा खात्याचा मर्यादित राहत नाही. भाजपच्या सर्व मंत्र्यांनी लोकांमध्ये जाऊन असे दरबार घ्यायला हवेत. असे नाईक यांनी म्हटले. लवकरच अंबरनाथमध्ये जनता दरबार भरवणार असल्याचीही घोषणा त्यांनी या वेळी केली. त्यांच्या या विधानामुळे अंबरनाथातील राजकीय तापमान वाढले असून, शहरात राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. या वेळी माजी आमदार नरेंद्र पवार, निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील तसेच विविध प्रभागांतील उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा येथे मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्यात येणाऱ्या गोडाऊनला आग

Nashik Kumbh Mela : सिंहस्थात भाविकांची पायपीट थांबणार! गोदाघाटाजवळच उभारली जाणार अंतर्गत वाहनतळे

SCROLL FOR NEXT