भांडुप परिमंडळात वीज देयक वसुली
मोहीम जोरात सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : सध्या संपूर्ण भांडुप परिमंडळात वीजबिल वसुली मोहीम चालू आहे. यामध्ये थकबाकी असलेल्या २७,४९८ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना सुट्टीच्या दिवशीही सहजपणे वीजबिल भरता यावे म्हणून भांडुप परिमंडळातील वीजबिल भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे.
२९ आणि ३० नोव्हेंबर या सुट्टीच्या दिवशी सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार असून, ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. वीजबिल भरणा केंद्रासह महावितरणने वीजबिल भरण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाइन वीजबिलाचा भरणा केल्यास १० रुपयांची सूट मिळत आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा महावितरणच्या मोबाईल ॲप तसेच ऑफलाइन पर्याय जसे की बँक, खासगी खात्रीशीर भरणा केंद्रांचा वापर करता येतो. ग्राहकांनी अखंडित वीजसेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करावा, असे आवाहन भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.