मुंबई

वाढीव दिवसामुळे उमेदवारांना दिलासा

CD

वाढीव दिवसामुळे उमेदवारांना दिलासा
४८ तासांचा नियम मोडीत; निवडणूक आयोगाचा नगरपालिका निवडणुकीसाठी निर्णय!

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने प्रचारासाठी एक दिवसाची वाढ देऊन उमेदवारांना दिलासा दिला आहे. मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी उमेदवारांना पुरेसा कालावधी मिळत नसल्याची मागणी विविध पक्षांनी केली होती. त्याची दखल घेत आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सर्वसाधारणपणे मतदानाच्या ४८ तास आधी प्रचारबंदी लागू होते; मात्र यंदा या नियमाला अपवाद करीत आयोगाने प्रचारासाठी वाढीव वेळ दिला आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत प्रचाराची परवानगी देण्यात आली आहे. २ डिसेंबरला मतदान होणार असल्याने यंदा प्रचारबंदी केवळ नऊ ते दहा तास आधीच लागू होणार आहे. या निर्णयामुळे निवडणुकीचे वातावरण अधिक तापले असून, उमेदवारांना शेवटच्या टप्प्यात त्यांच्या संपर्क मोहिमेला गती देण्यासाठी मोठा अतिरिक्त अवधी मिळाला आहे. मतदारांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचता येईल, अशी भावना उमेदवारांमध्ये आहे.

‘मतदार खरेदी’वर करडी नजर
प्रचारासाठी मिळालेला अतिरिक्त कालावधी उमेदवारांचा उत्साह वाढवणारा असला, तरी काही संभाव्य धोक्यांचाही अंदाज व्यक्त होत आहे. निवडणुकांमध्ये शेवटच्या काही तासांत अनेकदा आर्थिक प्रलोभने आणि मतदारांवर प्रभाव टाकण्याचे गुप्त प्रयत्न होण्याची शक्यता असते. वाढीव वेळेत उमेदवार प्रचाराला विश्रांती देतील की मतांसाठी आर्थिक हालचालींना वेग देतील, हा शहरात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या अतिरिक्त वेळेत पारदर्शकता राखली जावी आणि गैरप्रकारांवर कडक नजर ठेवली जावी, अशी अपेक्षा शहरातील सजग मतदारांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Crime : बारामती तालुका पोलिसांनी प्रेमी युगुलाला लुटणा-या तिघांना काही तासात केले गजाआड....

Mathura Holika Dahan: जळत्या होळीमध्ये चालतो माणूस; मथुरेतील 'या परंपरेमागचं रहस्य काय? ४५ दिवसही करतो अन्नत्याग

ISRO मध्ये वैज्ञानिक असल्याचे सांगत लग्नाचं आमिष; पुण्यातील महिलेकडून ४२ लाख रुपये उकळले...

IND vs ENG, Semi: भारताने इंग्लंडविरुद्ध कोणती Playing XI खेळवावी? रवी शास्त्री, रिकी पाँटिंग यांचा सल्ला; म्हणाले, अभिषेकला तर...

विकी कौशल चिमुकलीच्या चक्क पडला पाया! स्टेजवरचा तो क्षण पाहून सगळेच झाले भावूक, Viral Video

SCROLL FOR NEXT