मुंबई

उल्हासनगरात भूसंपादन मोजणी पूर्ण!

CD

उल्हासनगरात भूसंपादन मोजणी पूर्ण!
तिसरा-चौथा रेल्वेमार्ग प्रकल्प गतिमान

उल्हासनगर, ता. २९ (वार्ताहर): उल्हासनगरच्या विकासाला गती देणाऱ्या आणि कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील अपेक्षित तिसऱ्या व चौथ्या नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादन व बाधित क्षेत्राच्या मोजणीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा शुक्रवारी (ता. २८) प्रत्यक्षात पूर्ण करण्यात आला आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशांनुसार आणि उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ही निर्णायक प्रक्रिया वेगाने पार पाडली. महापालिका, नगरभूमापन आणि नगररचना विभागाच्या प्रभावी समन्वयामुळे आता या प्रकल्पाचा मार्ग अधिक प्रशस्त झाला आहे.

राज्य सरकारच्या पायाभूत सुविधांच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रेल्वे विस्तार प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियेतील सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. नगर भूमापन कार्यालयातील गीता पवार यांच्या नेतृत्वाखालील पथक, नगररचना विभागाकडील सर्वेअर दत्ता भोईर, तसेच महापालिका मालमत्ता विभागामार्फत सहायक आयुक्त अजय साबळे, मालमत्ता व्यवस्थापक छाया डांगळे आणि कनिष्ठ अभियंता सुमीत मुकादम यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.

प्रक्रियेचे स्वरूप
संपूर्ण सर्वेक्षणादरम्यान संपादित क्षेत्राचा नकाशा, बाधित मालमत्तेचे निरीक्षण, नकाशेवरील नोंदी आणि वास्तवदर्शी पंचनामे तयार करण्यात आले. सर्व उपस्थित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मोजणी व पंचनाम्याची प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण झाली. या निर्णायक पावलामुळे तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गाच्या कामाला अधिकृत गती मिळणार आहे. यामुळे परिसरातील वाहतूक आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा मार्ग अधिक सुलभ झाला आहे.

कल्याण–कसारा रेल्वे मार्गाचा तिसरा व चौथा मार्ग हा या विभागाच्या भविष्यातील वाहतूक सक्षमीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज झालेली मोजणी व रेखांकन प्रक्रिया हे त्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल आहे. संबंधित सर्व विभागांनी उत्तम समन्वय ठेवून अचूक व पारदर्शक पद्धतीने कार्य पूर्ण केले आहे. नागरिकांच्या हिताचे रक्षण व विकास प्रकल्पांची शाश्वत अंमलबजावणी हीच आपली प्राथमिकता असून, पुढील सर्व टप्प्यांमध्येही प्रशासन तितक्याच वेगाने व दक्षतेने कार्य करणार आहे.
मनिषा आव्हाळे, महापालिका आयुक्त, उल्हासनगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT