मुंबई

विद्यार्थ्यांचा प्रशासनाशी संवाद : ‘चला कार्यालय बघूया’

CD

प्रशासनाशी थेट संवाद : ''चला कार्यालय बघूया'' उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जव्हार प्रकल्प कार्यालयाच्या भेटीतून विद्यार्थ्यांना शासकीय कामाची प्रत्यक्ष ओळख
पालघर, ता. २९ (बातमीदार) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत सर्व शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या "चला कार्यालय बघूया" या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना थेट प्रशासकीय कार्यालयांना भेट देऊन शासकीय कामकाजाची प्रत्यक्ष ओळख करून दिली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनीही या उपक्रमाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या दौऱ्यात विद्यार्थी प्रकल्प कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज, नोंदींची प्रक्रिया आणि दैनंदिन प्रशासकीय कामाची पद्धत अनुभवत आहेत. भेटीदरम्यान विद्यार्थी आपल्या शाळांच्या अडचणी आणि सुधारणा थेट प्रकल्प अधिकाऱ्यांपुढे मांडत आहेत. हा उपक्रम केवळ प्रकल्प कार्यालयापुरता मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनसह इतर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांनाही भेट देण्याची संधी मिळत आहे.
जव्हार प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी सांगितले की, हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रशासनाची सखोल आणि वास्तवदर्शी ओळख करून देतो, जो त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी महत्त्वाचा ठरेल. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांसाठी सुवर्णसंधी! महाराष्ट्रात ५,५०६ पदांसाठी मेगा प्राध्यापक भरती होणार; तारीख सांगून महायुती सरकारचा मोठा निर्णय

Iran War: युद्धाचा परिणाम इंटरनेटवरही! भारतात नेट बंद होण्याची शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात?

इतिहासात लपून गेलय 'हे' ठिकाण जिथे श्रीकृष्ण अन् सुदामाची झालेली भेट; मूठभर पोहे बनले छप्पन भोग, आयुष्यात एकदातरी नक्की द्या भेट

माझ्या घटस्फोटादरम्यान बाबा एखाद्या मित्रासारखे सोबत होते... शर्मिष्ठा राऊतने वडिलांबद्दल केला भावुक खुलासा

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

SCROLL FOR NEXT