मराठी ही अभिजनांची, बहुजनांची भाषा
विवेकानंद व्याख्यानमालेत डॉ. गणेश देवी यांचे वक्तव्य
शिवडी, ता. २९ (बातमीदार) ः जगातील पाच खंडांमध्ये जवळजवळ सात हजार भाषा बोलल्या जातात. या बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषांमध्ये मराठीचा १८वा नंबर आहे. तसेच एक हजार ५०० वर्षे जुन्या भाषांमध्ये मराठीचा सातवा नंबर आहे. मराठी अभिजनांची भाषा झाली, कारण ती बहुजनांची आहे. त्यामुळे मराठी भाषा ही अभिजात असून अभिजनांची आणि बहुजनांची आहे, असे पद्मश्री आणि मराठी भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या ६८व्या विवेकानंद व्याख्यानमालेत ‘भाषा अभिजात आणि बहुजन’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले, त्या वेळी ते बोलत होते. पुढील ३० वर्षांमध्ये सात हजार भाषा मरतील, असे भाकीत त्यांनी या वेळी व्यक्त केले. मराठी ही ज्ञानाची आणि कामाची भाषा करायची आहे. संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषेची सरमिसळ होत राहिली. यामध्ये प्राकृत भाषा लुप्त झाली; मात्र संस्कृत ही भाषा अजूनही टिकून आहे.
नवीन तंत्रज्ञानामुळे लोकांची स्मरणशक्ती अल्पकालीन झाली आहे, असेही गणेश देवी यांनी सांगितले. प्रास्ताविक उपमंडळ प्रमुख नरेश विचारे यांनी, मान्यवरांचा परिचय आणि आभार सहाय्यक शारदास्मृती प्रमुख साहिल पाटील यांनी केले. बोधपटाचे वाचन आर्यन वारे तर सुस्वागतम प्रथम होडे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.