दादरमध्ये क्रिकेट आणि खो-खोची चुरस रंगणार
मुंबई, ता. २९ ः मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली नाईट फ्रेंड्स क्रिकेट क्लबने दादर येथील दत्ता राऊळ मैदानात रविवारी (ता. ३०) मर्यादित चेंडूचे दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. तसेच इन्स्पायर फाउंडेशनने केशव दाते मैदानात मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने कुमार मुली गट जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. क्रिकेट आणि खो-खो या दोन्ही लोकप्रिय खेळांच्या माध्यमातून तरुणांना शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धात्मक वृत्ती, संघभावना आणि क्रीडासंस्कार रुजवण्याचा प्रयत्न असणार आहे, असे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले. विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.