मुंबई

वाढदिवस साजरा करणे पडला महागात चौघांवरून दाखल

CD

फटाके वाजवून वाढदिवस साजरा करणे महागात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : रात्री बारा वाजल्यानंतर फटाके वाजून वाढदिवस साजरा करणे चार जणांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी त्या चौघांविरोधात कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांचे मनाई आदेश लागू असताना देखील फटाके वाजवल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.
रोहित पिंपळोलकर (गायकवाड) यांचा गुरुवारी (ता. २७) वाढदिवस असल्याने रात्री बारानंतर कोपरी येथील सिध्दार्थनगर साईराम बिल्डींगच्या खाली काही मुले केक कापून फटाके वाजवत होते. ही बाब कोपरी पोलिस ठाण्याचे गस्त पथकाला दिसून आले. तदपूर्वी पोलिसांनी वाढदिवसाचे आयोजकांना सार्वजनिक शांततेचा भंग न करण्याबाबतची नोटीस दिली होती. तरी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून ठाणे शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले. त्यानुसार कल्पेश अनिल मोरे (२७), सुशांत शशिकांत मोरे (२७), योगेश मनोहर पांचाळ (४०) आणि मयुर सुधाकर नार्वेकर (३७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT