मुंबई

रोझरी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची संविधान जागरूकता रॅली

CD

रोझरी कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांची संविधान जागरूकता रॅली
मुंब्रा, ता. २९ ः रोझरी कॉन्व्हेंट हायस्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाची माहिती, त्यातील मूल्ये आणि नागरिक म्हणून असलेल्या कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
यानिमित्‍त संविधान जागरूकता रॅली काढण्यात असून विद्यार्थ्यांनी हातात आकर्षक, मनोवेधक आणि संदेशपूर्ण पोस्टर्स धरले होते. या पोस्टर्सद्वारे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचा प्रभावी संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यात आला. रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्साह आणि देशप्रेमाची झलक स्पष्टपणे दिसून आली.
शाळेच्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी प्रस्तावना, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, राष्ट्रनिष्ठा दर्शविणारे सुंदर चार्ट्स व चित्रे तयार केली होती. प्राचार्यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांच्या परिश्रमांचे कौतुक करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा अधिक दृढ होते. कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेत केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price Hike: गॅस सिलिंडर दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले; मध्यमवर्गीय व कामगार कुटुंबांवर आर्थिक ताण

कीर्ती आझाद काय म्हणाले, यावर मी आता काय बोलू? इशान किशनचा Video Viral; माजी खेळाडूनं केलंय वादग्रस्त विधान....

माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे पण... अनेक वर्षांपासून सख्ख्या बहिणीसोबत बोलत नाही नेहा पेंडसे; कारण सांगत म्हणाली- 'आमच्यात...'

Latest Marathi News Live Update : नाशिक-नगरच्या कांद्याला मॉरिशसची बाजारपेठ; १ लाख टन निर्यातीची घोषणा

chhatrapati sambhajinagar rada: भाजप पदाधिकारी अन् अंबादास दानवेंमध्ये तुफान राडा

SCROLL FOR NEXT