मुंबई

मार्गशिर्षनिमित्त फळे, भाज्यांची आवक वाढली

CD

मार्गशिर्षनिमित्त फळे, भाज्यांची आवक वाढली
मांसाहार वज्र्य असल्याने खरेदीसाठी गर्दी
अलिबाग, ता. २९ वार्ताहर ः हिंदू संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. धनसंपत्ती, सुख-समृद्धी नांदावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीची स्थापना करून महिलांकडून उपवास केला जातो. त्यातच हिवाळ्यात विविध पालेभाज्यांसह वांगी, घेवडा, गाजर, दुधी, विविध प्रकारची कंदमुळे उपलब्ध होत असतात. बाजारात सध्या या भाज्यांची आवक वाढली असून विविध प्रकारची फळेही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. अनेक जण मांसाहार वज्र्य करून शाकाहार घेतात. त्यामुळे या महिन्यात भाज्यांचे दर वाढलेले असतात. असे असले तरीदेखील हिवाळ्यात विविध प्रकारच्या भाज्या येत असल्याने त्‍यांची आवक वाढली आहे. यामध्ये मुळा, माळ, पोकळा, मेथी या पालेभाज्यांसह वांगी, वांगी, घेवडा, गाजर, दुधी, तोंडली, गवार अशा प्रकारच्या भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. यासोबतच विविध कंदमुळेही बाजारात विक्रीसाठी दाखल झाली आहेत. या सर्व भाज्या रासायनिक खत न वापरता लागवड केलेल्या असल्याने स्थानिकांस पर्यटकांची या भाज्या विकत घेण्यासाठी गर्दी होत आहे.
.................
चैकट:
फळांची आवकही वाढली
बजारात सध्या अंजिर, पेर, ड्रॅगन, वेलची केळी, मोसंबी, संत्री, बोरे अशा विविध प्रकारची फळे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. मार्गशिर्ष महिन्यात महिला वर्ग उपवास करत असल्याने तसेच दर गुरुवारी महालक्ष्मीची स्थापना करून पूजा केली जात असल्याने ही फळे खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

Latest Marathi News Live Update : अंधेरी लोखंडवाला परिसरात महिलेचा चैन चोरी करणाऱ्या सराईत साखळी चोराला अवघ्या ५ तासात अटक

Cosmetic Treatment Safety: लेसर, बोटॉक्स, हेअर ट्रान्सप्लांट करण्यापूर्वी सावधान! तज्ज्ञांकडूनच उपचार घेण्याचा इशारा

Kolhapur Bangalore airport connectivity : देशातील सर्वात मोठा आयटी पार्क असलेल्या शहरासोबत कोल्हापूर विमानसेवा होणार सुरू

SCROLL FOR NEXT