मुंबई

कुणबी समाजातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तालुका बैठक

CD

कुणबी समाजातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची तालुका बैठक
तळा, ता. २९ (बातमीदार) ः आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कुणबी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, यासाठी तळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुणबी समाजातील कार्यकर्ते एकत्र आले. तळा येथील कै. अशोकशेठ लोखंडे सभागृहात शुक्रवारी (ता. २८) आयोजित तालुका स्तरीय बैठकीत बहुसंख्य कार्यकर्त्यांनी तालुक्यातील आरक्षित, सर्वसाधारण आणि ओबीसी जागांवर कुणबी समाजाची उमेदवारी नक्की मिळाली पाहिजे, अशी एकच भूमिका मांडली.
ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णा चाळके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस तालुक्यातील कुणबी समाजाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये समाजनेते रवींद्र मांडवकर, कुणबी समाज तालुका अध्यक्ष नामदेव काप, रायगड जिल्हा कुणबी युवक अध्यक्ष सचिन कदम, युवक नेते देवा रामाणे, परशुराम वरंडे, बबन भौड, साधुराम पिंपळे, अशोक राणे, घाडगे, जनार्दन पांढरे, कांतीलाल कजबले, नागेश लोखंडे आदींचा समावेश होता. वक्त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की तळा तालुक्यात सुमारे ८० टक्के लोकसंख्या कुणबी समाजाची आहे. नेतृत्व आमचे, मेहनत आमची, संघटन आमची मग उमेदवार आमचे का नसावेत?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्‍यामुळे तालुक्यातील २ जिल्हा परिषद आणि ३ पंचायत समिती जागांवर कुणबी उमेदवारच असावा, यासाठी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे अधिकृत निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
........................
बोरघर–हवेली गणातील अन्यायाचा उल्लेख
या बैठकीत बोरघर–हवेली (माजी महागाव) जिल्हा परिषद गणातील राजकीय परिस्थितीवर नाराजी व्यक्त करण्यात आली. या गणात सर्वसाधारण आरक्षण पडूनही कुणबी समाजाला वारंवार संधी नाकारली गेल्याचे दुर्दैव असल्याचे मत मांडले गेले. यावेळी मात्र कुणबी उमेदवारच असला पाहिजे; त्याला विजयी करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सर्व उपायांचा वापर करू, असा ठाम निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : नागपूरमध्ये फेब्रुवारीत हवेची गुणवत्ता खालावली; महाल परिसर सर्वाधिक प्रदूषित

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT