मुंबई

पेण शहराचा चेहरामोहरा बदलणार

CD

पेण शहराचा चेहरामोहरा बदलणार
कॉर्नर सभेतआमदार रवीशेठ पाटील यांचे आश्वासन
पेण, ता. २९ (वार्ताहर) ः पेण शहराच्या विकासाचा वेग येत्या पाच वर्षांत लक्षणीयरीत्या वाढणार असून शहराचा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा ठाम विश्वास आमदार रवीशेठ पाटील यांनी व्यक्त केला. पेण पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खान मोहल्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. या सभेत भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीतून प्रभाग क्रमांक ७ मधून उभे असलेले उमेदवार आफ्रिन अखवारे, सुभाष आवास्कर आणि थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील यांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक हजर होते.
आमदार पाटील म्हणाले की, गेल्या पाच ते दहा वर्षांत पेणमध्ये अनेक विकासकामांना गती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, भुंडापूल, नदी संवर्धन घाट, स्मशानभूमी, कब्रस्तान यांसारखी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. शहरातील रस्ते, गटारे आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीकडेही लक्ष देण्यात आले. पावसामुळे रिंगरोडचे काम काही काळ रखडले असले तरी ते लवकरच सुरू होणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून पुढील पाच वर्षांत पेण शहराचा विकासात्मक कायापालट होणार आहे.
यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, विरोधक केवळ विकासाच्या गप्पा मारत आले आहेत. पण याच भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी अर्बन बँकेला डुबवून असंख्य कुटुंबांचे आर्थिक संसार उद्ध्वस्त केले. आता ते कोणत्या तोंडाने मतदारांसमोर येत आहेत? नागरिकांनी अशा लोकांना जाब विचारला पाहिजे. पुढे बोलताना त्यांनी आगामी काळात विकास अधिक गतीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
.................
विकासाचा वेग कायम ठेवू
सभेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रितम पाटील यांनीही जनतेसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, मी आपल्या कुटुंबातीलच सदस्य म्हणून तिसऱ्यांदा नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे. मागील दोन कार्यकाळांत आपण दिलेले प्रेम, पाठबळ आणि विश्वास माझ्यासाठी अनमोल आहे. गेल्या दहा वर्षांत पेण शहर विकासकामांसाठी कधीही मागे राहिले नाही, आणि पुढेही आम्ही हा वेग कायम ठेवू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, अनिल बोंडे यांच्याकडून टीका

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT