मुंबई

‘तारागिरी’ स्वदेशी सामर्थ्याची नवी ताकद

CD

‘तारागिरी’ नौदलात; स्वदेशी सामर्थ्याची ताकद
ब्राह्मोस, बहुउद्देशीय रडार आणि प्रगत संरक्षण प्रणालीमुळे लढाऊ क्षमता वाढणार
मुंबई, ता. २९ : माझगाव डॉक शिपबांधणी लिमिटेड (एमडीएल) यांनी तयार केलेली नीलगिरी वर्गातील चौथी आणि एमडीएलची तिसरी युद्धनौका ‘तारागिरी’ गुरुवारी (ता. २८) भारतीय नौदलाकडे सुपूर्द झाली. पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित या अत्याधुनिक युद्धनौकेमुळे नौदलाची समुद्री ताकद आणखी वाढणार आहे.
‘तारागिरी’ ही १९८० ते २०१३ या ३३ वर्षांच्या कालावधीत देशसेवा केलेल्या जुन्या आयएनएस तारागिरीची आधुनिक आवृत्ती आहे. नव्या जहाजात ध्वनिरहित हालचाल, अधिक संरक्षण, स्वयंचलित नियंत्रण आणि शक्तिशाली शस्त्रसामग्री बसवण्यात आली आहे. या जहाजाची रचना युद्धनौका रचना प्राधिकरणाने केली असून, बांधकामावर मुंबईतील देखरेख पथकाने लक्ष ठेवले. प्रकल्प १७अ मधील या फ्रिगेटमध्ये आधीच्या शिवालिक वर्गापेक्षा अधिक प्रगत साधने आहेत.

बांधकामाचा वेग वाढला
प्रकल्प १७ अ मधील हे ११ महिन्यांत नौदलाकडे सुपूर्द झालेले चौथे जहाज आहे. ‘तारागिरी’चे बांधकाम केवळ ८१ महिन्यांत पूर्ण करणे शक्य झाले. उर्वरित तीन जहाजे ऑगस्ट २०२६ पर्यंत नौदलात दाखल होणार आहेत. यामध्ये डिझेल किंवा गॅसवर चालणारी संयुक्त शक्ती व्यवस्था, एकत्रित नियंत्रण प्रणाली, ब्राह्मोस क्षेपणास्त्र, बहुउद्देशीय समुद्री शोध रडार, मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, ७६ मिमीची मुख्य तोफ, ३० मिमी आणि १२.७ मिमी प्रतिकार तोफा, पाणबुडीविरोधी टॉर्पिडो यांचा समावेश आहे.

स्वदेशी उद्योगांना मोठा लाभ
या प्रकल्पात ७५ टक्के स्वदेशी सामग्री, २०० हून अधिक लघुउद्योगांचा सहभाग, चार हजार थेट आणि १० हजारांहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला आहे. ‘तारागिरी’ ही भारताच्या जहाजबांधणी कौशल्याची आणि नौदलाच्या स्वावलंबन ध्येयाची महत्त्वाची पायरी मानली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Israel Iran conflict : अमेरिका, इस्राईलनंतर आता इंग्लंड, फ्रान्स, जर्मनीही इराण विरोधात युध्दात उतरले

छावासाठी पुरस्कार जिंकताच विकी कौशलची पोस्ट, पोस्टवर संतोष जुवेकर कमेंट करत म्हणाला...

Latest Marathi News Live Update : सलग चौथ्या दिवशी पुणे–दुबई आणि अबू धाबी विमानसेवा बंद

Iran-Israel conflict: इराण-इस्रायल संघर्षात पुणेकर संकटात? सुरक्षित परतीसाठी महापालिकेची तातडीची हालचाल

Jalna News : जालना ड्रायपोर्ट महिनाभरात होणार सुरू! ४२५ एकरांवरील प्रकल्पातून मराठवाडा-विदर्भाची उत्पादने आता थेट परदेशात जाणार

SCROLL FOR NEXT