मेट्रो-४चे विक्रोळी स्थानक कांजूरमार्ग स्थानकाशी जोडणार
७५० मीटर लांबीचा पादचारी पूल उभारणार, ९३ कोटींचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : मेट्रो-४ मार्गावरील विक्रोळी स्थानकातून प्रवाशांना सहजपणे मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात जाता यावे, म्हणून एमएमआरडीएकडून दोन्ही स्थानकांदरम्यान तब्बल ७४० मीटर लांबीचा पादचारी पूल उभारला जाणार आहे. त्यासाठी तब्बल ९३ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, पुढील १८ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे विक्रोळी परिसरातील मेट्रो आणि रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एमएमआरडीएकडून उभारल्या जात असलेल्या वडाळा-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून, टप्प्याटप्प्याने मुंबईकरांच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएकडून मेट्रोच्या विक्रोळी स्थानकापासून मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकापर्यंत सहजपणे ये-जा करता यावी म्हणून पादचारी पूल उभारला जाणार आहे. त्यासाठीचा आराखडा तयार केला असून, निविदा काढल्या आहेत.
------
सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
सुरक्षेच्या दृष्टीने या पादचारी पुलावर २५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत. त्यामुळे रात्री उशिराही या पुलावरून महिलांना ये-जा करणे सुरक्षित ठरणार आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे एमएमआरडीएकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.