मुंबई

नेरूळमध्ये उपआरोग्य केंद्र उभारणीला वेग

CD

नेरूळमध्ये उपआरोग्य केंद्र उभारणीला वेग
भूखंड उपलब्ध; नागरिकांच्या आरोग्यसेवेला मोठा दिलासा
नेरूळ, ता. २९ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ८ मधील भूखंड क्रमांक २ ए येथे उपआरोग्य केंद्रासाठी अधिकृतपणे जागा उपलब्ध झाल्याने त्‍याच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी नगरसेविका सुनीता मांडवे आणि माजी नगरसेवक रतन मांडवे यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर अखेर हा प्रश्न निकाली लागला आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पोर्ट्राकेबिन उभारून उपआरोग्य केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
नेरूळ सेक्टर २, ८ आणि १० मधील नागरिकांना आतापर्यंत उपचारासाठी मीनाताई ठाकरे रुग्णालय, शिरवणे येथील आरोग्य केंद्र किंवा सेक्टर २० मधील उपआरोग्य केंद्रावर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे वेळ, प्रवास आणि सुविधा यांबाबत अनेक समस्या जाणवत होत्या. त्या पार्श्वभूमीवर सेक्टर ८ मधील स्वतंत्र आरोग्य केंद्राची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. सिडकोकडून पालिकेकडे भूखंड हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू असतानाच आरोग्य विभागाने मालमत्ता विभागाकडे संबंधित भूखंडाबाबत सविस्तर माहिती मागवली. मालमत्ता विभागाकडून भूखंडाचा आरोग्य केंद्रासाठी वापर करण्यास हरकत नाही, असा सकारात्मक प्रतिसाद मिळताच उपआरोग्य केंद्र उभारणीची प्रक्रिया अधिकृत झाली. या निर्णयामुळे हजारो नागरिकांना तातडीच्या आरोग्यसेवा सहज उपलब्ध होणार आहेत. परिसरातील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून, उपकेंद्र सुरू झाल्यानंतर आरोग्य सेवा अधिक सुलभ व दर्जेदार होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Shortage: 'एचपी गॅस'कडून निवेदन; देशात गॅसची काय परिस्थिती? स्पष्ट सांगितलं

राजघराण्याशी संबंध, अनुभवी राजकारणी, भाजपचा प्रमुख चेहरा अन्...; महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मांचा राजकीय प्रवास काय?

महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! प्रसूती रजा वाढवली; अतिरिक्त अर्ध-पगारी सुट्टीही मिळणार, किती दिवसांची?

T20 World Cup : अहमदाबाद में जितना जरूरी था, आपको तो पता ही हैं! सूर्यकुमार यादव मुंबईत येताच काय म्हणाला बघा Video Viral

Mumbai Weather: कोकण-मुंबई पट्ट्यात उष्णतेची तीव्र लाट, वातावरण कसं राहणार? हवामान तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT