एसआरएच्या घरांचे वितरण लाॅटरीने
वशिलेबाजीला चाप : समितीच्या देखरेखीखाली वितरण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये तयार होणाऱ्या घरांचे संबंधित झोपडीधारकांना लाॅटरीद्वारे वितरण केले जात आहे. एसआरए प्राधिकरणाने नुकत्याच सुरू केलेल्या या पद्धतीमुळे वशिलेबाजीला चाप बसू लागला आहे. ही लाॅटरी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या समितीच्या देखरेखीखाली काढली जात असल्याने रहिवाशांमध्ये होणारे वाद कमी होऊ लागले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या असून, त्याचा एसआरच्या माध्यमातून खासगी विकसक पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत. आतापर्यंत इमारत पूर्ण झाल्यानंतर घरांच्या वितरणसंबंधित सोसायटीचे सभासद आणि विकसक स्वत: करत. त्यामुळे अनेक सभासदांवर अन्याय होतो, अडगळीचे घर दिल्याच्या तक्रारी येत. त्याची दखल घेत एसआरए प्राधिकरणाने तयार इमारतीमधील घरांच्या वितरणासाठी स्वतंत्र समितीच्या माध्यमातून लाॅटरी काढली जात आहे. या समितीत एसआरएचे कार्यकरी अभियंता, सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक, इस्टेट मॅनेजर असून, त्यांच्यासह सभासदांच्या उपस्थित एसआरए कार्यालयात ऑनलाइन लाॅटरी काढली जाते. त्यामुळे वशिलेबाजीला चाप लागला असल्याने तक्रारी कमी झाल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
____
ओसीनंतर लाॅटरीची प्रक्रिया
एसआरएअंतर्गत इमारत तयार होऊन भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) आल्यानंतर सदनिका वाटपासाठी लाॅटरीची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यासाठी सर्व झोपडीधारक सभासदांना नोटीस दिली जाते. त्यानंतर सर्वांसमक्ष लाॅटरी काढली जात असल्याने आरोप-प्रत्यारोप करण्यास वाव राहत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.