मुंबई

योगीधाम परिसरातून शहाड स्टेशन रोड परिसरात जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्याची भाजपाची मागणी

CD

शहाड-योगीधाम दरम्यान नवा पादचारी पूलाची मागणी
भाजपचे शहर अभियंत्याला पत्र
कल्याण, ता. ३० (वार्ताहर) : योगीधाम परिसरातून शहाड स्थानक रस्ता परिसरात जाण्यासाठी पादचारी पूल बांधण्याची मागणी भाजपच्या नवीन मंडळ कल्याण शहर उपाध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी पालिका शहर अभियंता अनिता परदेशी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कल्याण पश्चिमेतील घोलप नगर, योगीधाम, कैलास गार्डन, गुरु आत्मन परिसरात मोठ्या प्रमाणात बिल्डिंग तयार झाल्या असून यामुळे रहदारी वाढली आहे. या परिसरातून मुरबाड आणि शहाडला जाण्यासाठी सध्या एक उड्डाणपूल असून त्यावर अवजड वाहने, लांब पल्ल्याच्या बसेस, लहान गाड्या, दुचाकींची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरु असते. याच रहदारीयुक्त पुलावरून, शहाड स्थानाकाला जाण्यासाठी रेल्वे प्रवासी, शाळकरी मुले, वरिष्ठ नागरिक, कर्मचारी व इतर नागरिक पायी प्रवास करत असतात.
परिसरात एकच पादचारी पुल असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे आणखी एक पादचारी पूल निर्माण होणं आवश्यक असल्याचे पुष्पा रत्नपारखी यांनी म्हंटले आहे. अमृत धामपासून शहाडला अंबर हॉटेल किंवा डीएड कॉलेज जवळ किंवा शक्य असेल तिथे हा पूल निर्माण करण्याबद्दल विचार करता येऊ शकेल. हा पादचारी पूल निर्माण झाल्यास शहाड व कल्याण पश्चिमचा परिसर जोडला जाईल, अशी माहिती पुष्पा रत्नपारखी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspiring Story: मेहनतीच्या बळावर तिन्ही मुले डॉक्टर; एकाची एमबीबीएस तर दोघांची पदव्युत्तरला एंट्री, वडिलांनी स्वत: केला स्वयंपाक!

Viral Video: 'डोगेश भाई' ने आयआयटी मुंबईच्या क्लास रुममध्ये लावली हजेरी, श्वानाच्या व्हायरल व्हिडिओने घातला धुमाकूळ

Central Railway: चाकरमान्यांना दिलासा! होळी, उन्हाळी सुट्टीसाठी विशेष रेल्वे, १००हून अधिक गाड्यांचे आयोजन; पाहा वेळापत्रक

Post Office Scheme: या सरकारी योजनेत पैसे दुप्पट! FD पेक्षा कशी वेगळी? कोण करू शकतो गुंतवणूक? जाणून घ्या सर्व माहिती

Pune News: सकाळ + स्टडीरूमच्या ‘ग्रेट भेट’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवांचा दिशादर्शक संवाद

SCROLL FOR NEXT