मुंबई

नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी काँग्रेसचा पालिकेवर मोर्चा

CD

नागरिकांच्या मूलभूत हक्कांसाठी काँग्रेसचा पालिकेवर मोर्चा
पायाभूत सुविधांकडे पालिकेचे दुर्लक्ष; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
पनवेल, ता. २९ (बातमीदार) : पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पुढाकाराने घोट, कोयनावेळे तसेच तलोजा पंचनंद फेज १ ते ३ या विस्तृत परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर उपाययोजना व्हाव्यात, या मागणीसाठी पालिकेविरोधात मोर्चा काढण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील आणि माजी नगरसेवक हरेश केनी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
सिडकोकडून संबंधित वसाहतींना परवानग्या आणि भोगवटा प्रमाणपत्रे देण्यात आली असली, तरी पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याचा तीव्र आरोप काँग्रेसने केला आहे. नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळाव्या, या उद्देशाने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन सादर केले. मोर्चादरम्यान नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींत पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा, स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी, अपुरे ड्रेनेज जाळे, आरोग्य सेवा व औषधोपचार सुविधा नसणे, उद्याने व खेळमैदानांचा अभाव, स्मशानभूमीची कमतरता अशा अनेक मूलभूत प्रश्नांचा समावेश होता. याशिवाय, पालिकेची बससेवा, पोलिस स्टेशन, तसेच सार्वजनिक सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
महारेरा कायद्यानुसार पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही मुद्दा काँग्रेसने जोरदारपणे उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उमरासाठी जायचंय! दोनदा विमान रद्द झालं, पण आज जाणारच; तरुणाचा VIDEO व्हायरल

Yermala Crime : चोराखळी येथे कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सशस्त्र दरोडा; पिस्तूल–सुरे दाखवून ९.५१ लाखांचा मुद्देमाल लंपास

Crime News : तरूणपणी केला गुन्हा, म्हातारपणी झाली अटक; पोलिसांच्या जाळ्यात ३० वर्षांनतर असा अडकला फरार आरोपी

Nashik Municipal Budget : नाशिक मनपाचे ३०११ कोटींचे 'सिंहस्थ' बजेट सादर; करवाढ नाही, पण जाहिरात महागली!

Phulambri News : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT