घणसोलीत सोनेरी कोल्ह्याचे दर्शन
सेक्टर १० मधील मेघमल्हार सोसायटीत वावर
वाशी, ता. २९ (बातमीदार) ः घणसोली सेक्टर १० मधील सिडकोच्या मेघमल्हार सोसायटी परिसरात नुकताच सोनेरी कोल्हा दिसला आहे. निवासी भागात वन्यप्राणी आढळल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटीच्या आवारात फिरताना दिसलेल्या या कोल्ह्याचा व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली असून त्यांनी परिसरात गस्त वाढवली आहे.
घणसोली- पाम बीच रस्त्यालगतच्या खाडी परिसरात यापूर्वीही कोल्हे दिसल्याच्या घटनांची नोंद आहे; परंतु आता हा प्राणी थेट दाट लोकवस्तीच्या मेघमल्हार सोसायटीत दिसल्याने चिंता व्यक्त होत आहे. तज्ज्ञांच्या मते, खाडीकिनारी आणि मोकळ्या जागांमधील नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने हे प्राणी अन्नाच्या शोधात शहरी भागाकडे वळत आहेत. तसेच कचऱ्याच्या ढिगांमध्ये मिळणारे उरलेले अन्न, मोकळ्या जागेत टाकली जाणारी खाद्यपदार्थांची पॅकेट्स यामुळेही वन्यप्राणी आकर्षित होत असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. रहिवाशांनी अशाप्रसंगी घाबरून पळापळ न करता प्राण्यापासून अंतर ठेवावे. त्याच्या जवळ जाण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये. तसेच कचरा मोकळ्या जागेत न टाकण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.