बैलगाडा शर्यतीवरून वाद झाल्याने घोरड याची हत्या
टिटवाळा, ता. २९ (वार्ताहर) : मुरबाडमधील उंबरवाडा बैलगाडा शर्यतीच्या वेळी झालेल्या वादातून किरण घोरड याच्यावर हल्ला करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २८) मुरबाड महामार्गावरील मामणोली गावानजीक ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत किरण घोरड आणि हल्लेखोर तरुणांमध्ये मुरबाडमधील उंबरवाडा येथे झालेल्या बैलगाडा शर्यतीच्या वेळी तुफान वादावादी झाली होती. याच पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा प्रबळ संशय आहे. शुक्रवारी किरण घोरड हे मामणोली येथील एका धाब्यावर बसले असताना, ८ ते १० जणांच्या टोळक्याने अचानक त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केली. या हत्याकांडानंतर गोवेली आणि मामणोली परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्वतः पोलिस अधीक्षक डॉ. स्वामींसह मोठो पोलिस बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे.
भाईगिरीची फॅशन
सध्या वाढदिवस, हळदी समारंभ, क्रिकेट आणि बैलगाडा शर्यत अशा कार्यक्रमांमधून भाईगिरीची फॅशन मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे. यात अल्पवयीन आणि तरुणपिढी मोठ्या संख्येने गुन्हेगारीकडे वळत आहे. बैलगाडा शर्यत आणि क्रिकेट स्पर्धा यातून संघटित गुन्हेगारीला खतपाणी मिळत असून, या गुन्हेगारांचे होणारे उदात्तीकरण गुन्हेगारी वाढण्यास प्रमुख कारण ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.