मुंबई

नगराध्यक्ष निलेश पडवळे अटकेत

CD

विक्रमगडच्या नगराध्यक्षासह सहकारी अटकेत
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १११ कोटींचे गैरव्यवहार प्रकरण

जव्हार, ता. २९(बातमीदार) : जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांच्या जमा असलेल्या अनामत रकमेवर डल्ला मारण्यासाठी तब्बल १११ कोटी ६३ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रमगड नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष पिंका ऊर्फ नीलेश पडवळे आणि त्यांचा सहकारी यज्ञेश अंभिरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. जव्हारच्या न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
हा गैरव्यवहार बनावट चेक, बनावट सह्या आणि बनावट शिक्के यांच्या आधारे करण्यात येत असल्याचा संशय आहे. तपासात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन भोये यांनी शुक्रवारी रात्री जव्हार पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर प्रकरणाची अधिकृत नोंद झाल्याची माहिती दिली आहे.
---
घोटाळा उघडकीस आला कसा?
जव्हार येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात ठेकेदारांची वर्षानुवर्षे जमा असलेली अनामत रक्कम हडप करण्यासाठी १,११,६३,३१,८१० रुपयांचा चेक तयार करण्यात आला होता. दरम्यान, स्टेट बँकेत जमा करण्याकरिता देण्यात आलेला चेक हा येथील कार्यालयाच्या अधिकृत चेक बुकचा नसल्याचे तसेच त्यावरील सह्याही बनावट असल्याचे अकाउंटंट तातडीने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी तपास सुरू केला आणि संशयास्पद चेक एसबीआय जव्हार शाखेत जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले. बँक अधिकाऱ्यांनीही या चेकवरील शिक्के दिनांक आणि सह्या संशयास्पद असल्याचे ओळखून व्यवहार रोखला आणि पोलिसांना माहिती दिली.
या घोटाळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा ठपका ठेकेदारांनी ठेवला आहे. जव्हार विभागातील संशयास्पद हालचाली, बनावट शिक्के, चेकबुकचा गैरवापर यामुळे तपास आणखी खोलवर जाणार असून, लवकरच काही मोठे अधिकारी आणि त्यांचे कारनामे समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
----
सतर्कतेमुळे नुकसान टळले
एसबीआय शाखेचे व्यवस्थापक संजय कुजूर आणि तेथील कर्मचारी राहुल सोनवणे यांनी चौकशी करून प्रकरण उघडकीस आणले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे शेकडो कोटींचे सरकारी नुकसान टळले आहे. त्यांच्या या कामगिरीबद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी दोन्ही अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचा शाखेत जाऊन सत्कार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocity Act: मोठी बातमी! अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंमलबजावणीत बदल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, नवा नियम काय?

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT