मुंबई

ठाण्यात मतदारांची पळवा-पळवी

CD

ठाण्यात मतदारांची पळवापळवी!

भूभाग एका प्रभागात, मतदार दुसऱ्याच प्रभागात; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ ः शहरात मतदार पळवापळवी उघडकीस आली आहे. भूभाग ज्या प्रभागात आहे त्या प्रभागात मतदान करण्याचा मतदारांचा हक्क हिरावून तो दुसऱ्या प्रभागात वर्ग केला असल्याचा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी उघडकीस आणला आहे. दरम्यान, यासंदर्भातील सर्व पुरावे सोमवारी निवडणूक अधिकाऱ्यांना सादर करणार आहोत. त्यानंतरही दुरुस्ती केली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासू, असा इशाराही प्रधान यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्येच घोळ घातला असल्याचे उघडकीस आले आहे. त्याचा पर्दाफाश शनिवारी प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केला. या वेळी युवक कार्याध्यक्ष राजेश जाधव, मकसूद खान, जतीन कोठारे, दीपक क्षत्रिय, सचिन पंधरे आदी उपस्थित होते.
---
दबाव कारणीभूत
मनोज प्रधान यांनी दोन प्रभागांतील मतदार चोरी पुराव्यासह उघडकीस आणली आहे. त्यांनी सांगितले, की राबोडी प्रभाग क्रमांक १० मध्ये गेल्या अनेक निवडणुकांत समाविष्ट असलेल्या बापूजीनगर येथील मतदारांना प्रभाग क्रमांक ११मध्ये वर्ग करण्यात आले आहे. हे करीत असताना भूभाग मात्र प्रभाग क्रमांक १०मध्येच ठेवण्यात आला आहे. म्हणजेच प्रभाग क्रमांक १०मध्ये राहणाऱ्या २,६८० मतदारांना प्रभाग क्रमांक ११ मधील उमेदवारांसाठी मतदान करावे लागणार आहे. यामागे सत्ताधारी वर्गाचा प्रशासनावर असलेला दबाव कारणीभूत आहे. राबोडी भागात क्लस्टर डेव्हलपमेंट करण्यात येणार आहे. त्यास बापूजीनगरमधील नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळेच त्यांना प्रभाग क्रमांक १० मधून प्रभाग क्रमांक ११ मध्ये हाकलण्यात आले आहे, असा आरोप मनोज प्रधान यांनी केला. तर जतीन कोठारे यांनी अनेक मतदारांचे फोटो आणि नावे गायब करण्यात आलेली आहेत. त्यामुळे बोगस मतदानाची शक्यता बळावली आहे, असे सांगितले.

व्होटचोरीप्रमाणेच गंभीर प्रकार
हा प्रकार व्होटचोरीप्रमाणेच गंभीर आहे. सत्ताधाऱ्यांना नको असलेले मतदार भलतीकडेच वर्ग करायचे किंवा विरोधकांना सकारात्मक असलेले मतदार सत्ताधारी उमेदवाराला फायदेशीर ठरतील या प्रकारे पळवायचे, असा कट प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून केला आहे. जर अशा पद्धतीने निवडणुका घेण्यात येणार असतील तर लोकशाहीचे अस्तित्व राहील का, असा सवाल करून अंतिम मतदार यादीत फेरबदल न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष तीव्र जनआंदोलन उभे करेल, असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT