निष्ठेसाठी सत्तेला लाथ
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांचे विरोधकांना प्रत्युत्तर
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : काँग्रेस माझ्या मनात असून सत्तेला लाथ मारून निष्ठेसाठी मी काँग्रेसमध्ये परत आलेला कार्यकर्ता आहे. मी नेत्यांसह कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणारा आहे. काँग्रेस वाढवायची असल्याने नाराजांची मनधरणी करणार असल्याचे नवनिर्वाचित कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी सांगितले.
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षाने राजाभाऊ पातकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली. यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या नियुक्तीवर नाराजी व्यक्त करीत सामूहिक राजीनामे देत पातकर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला पातकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पातकर यांच्या जनसंपर्क कार्यलयात अनेक कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी पातकर बोलत होते.
---
पोटे काँग्रेसचेच
सचिन पोटे यांनी जरी राजीनामा दिलेला असला तरी सचिन पोटे हे काँग्रेसचेच आहेत. कुटुंबात वाद होत असतात, मात्र मी सर्वांना सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे. राजीनामे दिलेल्यांना स्वत: फोन करून चर्चा केली. त्यापैकी काही जण भेटून गेले. आपण पूर्वाश्रमीचे काँग्रेसी असून, काही कारणास्तव भाजपामध्ये गेलो होतो.
---
मेगाभरती
महायुतीतील नाराज निष्ठावान आणि माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून, कल्याण काँग्रेसमध्ये ३ डिसेंबरनंतर मेगा भरती होणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नवीन सिंग यांनी केला आहे. बहुजनांचे नेतृत्व करणारा जनसेवक असलेल्या राजाभाऊ पातकर यांना काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्यासोबत कार्यरत राहील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रीना खांडेकर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.