पालघर, ता. २९ : कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरुणीचा विनयभंग करून तिच्यासह कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तीन व्यक्तींविरोधात शुक्रवारी (ता. २८) रात्री ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी जमील खान याला शनिवारी (ता. २९) अटक करण्यात आली.
कासा पोलिस ठाणे हद्दीमध्ये तरुणाच्या वडिलांचे कृषी सेवा विक्री केंद्र आहे. तेथील घरात ती आपल्या कुटुंबासह राहते. या दुकानाच्या बाजूला जमील खानचे चिकन विक्रीचे दुकान आहे. बुधवारी (ता. २६) संध्याकाळी जमीलच्या दुकानात काम करणाऱ्या मुलाने तिला चुकीच्या हावभावाने बघितले आणि गाणी म्हणू लागला. त्या वेळी मुलीने जमीलला फोनवरून घडलेली हकीकत सांगितली; मात्र मुलाला समजावण्याऐवजी त्याने शुक्रवारी तरुणीच्या दुकानासमोर कार उभी करून, दुकानातील मुलाला शिवीगाळ का केली, असा जाब विचारला. त्यानंतर कुटुंबीयांना शिवीगाळ करत, तिच्या आतेबहिणीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. काही वेळाने तो हातात सुरा घेऊन मुलीच्या कुटुंबासमोर आला व कुटुंब नष्ट करून टाकीन, अशी धमकी दिली. या वेळी तरुणी तिथे गेली असता त्याने तिचा विनयभंग केला. तसेच तिचे भावोजी भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वार करत जखमी केले, असे तक्रारीत म्हटल्याचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश मांदळे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.