मुंबई

बेवारस वाहनांपासून मुक्ती

CD

उल्हासनगर, ता. २९ (बातमीदार) : शहरातील रस्त्यांवर महिनोनमहिने धूळ खात पडलेल्या बेवारस वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि स्वच्छतेतील अडथळे दूर करण्यासाठी उल्हासनगर महापालिका ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रभागांमध्ये संयुक्त मोहीम राबवत तब्बल ७० बेवारस वाहनांवर टोइंगची कारवाई करण्यात आली. ही माहिती नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी दिली.
आयुक्त तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील प्रमुख रस्त्यांवर दीर्घकाळापासून उभी असलेली निष्क्रिय वाहने ही वाहतूक कोंडीचे एक मोठे कारण असल्याचे निदर्शनास आले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त डॉ. धिरज चव्हाण, वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ, राजेश शिरसाठ, नोडल अधिकारी गणेश शिंपी, सहाय्यक आयुक्त व जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, अलका पवार आणि विशाल कदम उपस्थित होते. बैठकीत बेवारस वाहनांवर संयुक्त कारवाई त्वरित सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
निर्णयानंतर ११ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत महापालिकेचे अधिकारी आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७० बेवारस वाहने टोइंग करून महापालिकेच्या ताब्यात जमा केली. ही मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले की, त्यांच्या परिसरातील बेवारस वाहनांबाबतची तक्रार संबंधित प्रभाग समिती कार्यालयात नोंदवावी.


टोइंग केलेली वाहने सध्या महापालिकेच्या ताब्यात आहेत. वाहनधारकांनी आवश्यक वाहन कागदपत्रांसह हजेरी लावल्यानंतरच त्यांना वाहने परत देण्यात येणार आहेत. त्याबदल्यात दंड आकारला जाणार आहे.
- गणेश शिंपी, नोडल अधिकारी, उल्हासनगर पालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

SCROLL FOR NEXT