मुंबई

नियम मोडणाऱ्या बांधकामांना दणका

CD

पनवेल, ता. २९ ( बातमीदार) : मुंबई उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धनाबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल महापालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. त्यानुसार निरीक्षण, तपासणी आणि कारवाईची मोहीम राबविण्याच्या सूचना आयुक्त मंगेश चितळे यांनी दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कामोठे आणि खारघर प्रभाग समिती क्षेत्रातील विविध बांधकाम स्थळांची पाहणी करण्यात आली. यादरम्यान उपायुक्त स्वरूप खारगे यांनी हवा प्रदूषण नियंत्रणासाठी न्यायालयाच्या १५ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बांधकाम स्थळांवरील उपाययोजनांची तपासणी केली. प्रकल्प ठिकाणांवरील धूळ नियंत्रण, बांधकाम साहित्याचे संरक्षित साठवण, जिओ-फेंसिंग किंवा कव्हरिंग, रस्त्यांवर धूळ नियंत्रणाची साधने, पाणी मारण्याची यंत्रणा, डेब्रिज व कचरा व्यवस्थापन आणि कामगारांची सुरक्षा साधने यांसारख्या बाबींचे निरीक्षण केले.

पाहणीत काही बांधकाम प्रकल्पांनी मार्गदर्शक नियमांचे पालन केल्याचे आढळले; मात्र काही ठिकाणी मार्गदर्शक नियमांचे अंशतः पालन किंवा गंभीर त्रुटी जसे की धूळ नियंत्रण उपाययोजनांचा अभाव आणि बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. संबंधित बांधकाम प्रकल्पांना तत्काळ नोटिसा देण्याचे, दंडात्मक कारवाई करण्याचे आणि आवश्यक सुधारणात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आले.
या पाहणीदरम्यान पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण, कामोठे प्रभाग अधीक्षक दिपक शिलकन, खारघर प्रभाग अधीक्षक जितेंद्र मढवी, लिपिक प्रवीण व्हळगल तसेच कर्मचारी स्वप्नील कांबळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT