मुंबई

बदलापुरात पुन्हा पैसे वाटपाचा गाजावाजा;

CD

भाजप-शिवसेना आमनेसामने
बदलापुरात शिंदे गटाकडून दुसऱ्यांदा पैसे वाटपाचा आरोप
बदलापूर, ता. २९ (बातमीदार) ः शहरात भाजप कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाने केला आहे. या आरोपांमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बदलापूर पश्चिम प्रभाग क्रमांक ७ मधील सानेवाडी परिसरात मोठा गोंधळ झाला. शिवसेनेचे भरत नवगिरे यांनी भाजप कार्यकर्ते मतदारांना पैसे देत असल्याचा आरोप केला. नवगिरे यांच्या वहिनी संदीपा नवगिरे या प्रभागात उमेदवार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भरत नवगिरे घटनास्थळी पोहोचताच भाजप व शिंदे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि जोरदार वाद झाला.
---
आधारहीन आरोप
सानेवाडी येथील गुरुकमल या इमारतीच्या बाहेरच भाजप पैसे वाटत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला. यावरून मोठा वाद झाला. भाजप पदाधिकाऱ्यांनी मात्र कोणत्याही प्रकारचे पैसे वाटप झाले नसल्याचा दावा केला. प्रचारातील पिछाडी आणि हरण्याची भीती असल्याने शिंदे गटाकडून आधारहीन आरोप करण्यात येत आहेत.
--
वातावरण चिघळू नये
बदलापुरात अल्पावधीतच पैसे वाटपाच्या आरोपावरून दुसऱ्यांदा चर्चा सुरू झाल्याने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांत वाढलेला संघर्ष आणि परिसरात झालेला गोंधळ पाहता कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पक्षांनी अशा मार्गाने स्पर्धा वाढवल्याच्या चर्चाही शहरात सुरू आहेत. निवडणूक वातावरण चिघळू नये, यासाठी प्रशासनाकडून काटेकोर पावले उचलली जाण्याची गरज व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon मुंबई-नागपूर महामार्गावर अर्टिगा कारने चौघांना उडवलं, दोन नंबर प्लेट अन् गाडीत पोलिसांच्या काठ्या

Kim Jong Un missile test : किम जोंग उन अमेरिका -इराण युद्धात उतरणार? क्षेपणास्त्रांच्या केल्या चाचण्या, किम जोंग यांची मुलगी उपस्थित

Stock Market Today: तेलामुळे शेअर बाजार कोसळला! पण गॅस संकटामुळे या कंपन्यांचे शेअर्स 10 मिनिटांत 11% वाढले

Bhandara Accident: सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्याचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू; खानावळीत जेवण करून दुचाकीवरून घरी निघाले अन्..

Kolhapur MPSC Candidate :भावी अधिकाऱ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा परीक्षेचा निकाल प्रलंबित, यादी प्रसिद्ध न झाल्याने अस्वस्थता

SCROLL FOR NEXT