मुंबई

पिकाचू गँगच्या सदस्यांवर हल्ला

CD

‘पिकाचू गँग’वर जीवघेणा हल्ला
उल्हासनगरमध्ये पाच आरोपी गजाआड
उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : उल्हासनगर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. ‘पिकाचू गँग’चे सदस्य नॉडी आणि अंकित जैस्वाल यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात सामील असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

२६ नोव्हेंबरच्या रात्री उल्हासनगर क्रमांक दोन, रमाबाई आंबेडकरनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून आठ ते १० जणांच्या टोळीने तलवारी, बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर करून अनिकेत जैस्वाल आणि नॉडीवर हल्ला केला होता. या हल्ल्यात अनिकेत जैस्वालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर अनिकेतच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी तपास मोहीम सुरू करण्यात आली. पोलिस निरीक्षक लक्ष्मण कांबळे, पोलिस उपनिरीक्षक रंजीत वाळके यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत रमेश पवार, जय ऊर्फ दादू मोरे, दीपक शेजवाल आणि दोन अल्पवयीनांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असून, न्यायालयाने तीन मुख्य आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

आरोपींचा शोध युद्धपातळीवर
कारवाईनंतर पोलिस निरीक्षक लक्ष्मण कांबळे यांनी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्यांना कठोर इशारा दिला आहे. उल्हासनगरमध्ये अवैध कृत्ये, दहशत किंवा गुंडागिरी अजिबात सहन केली जाणार नाही. आता शहरात फक्त कायद्याचेच ‘राज’ चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध युद्धपातळीवर सुरू केला असून, पुढील दिवसांत आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT