मुंबई

रस्त्याच्या मध्यभागी ''फ्री स्टाईल'' हाणामारी

CD

रस्त्याच्या मध्यभागी ‘फ्री स्टाइल’ हाणामारी
उल्हासनगरमधील व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल
उल्हासनगर, ता. ३० (वार्ताहर) : शहराच्या कॅम्प दोनमधील गोलमैदान परिसरात एका व्यक्तीला रॉड आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी सुरू असलेल्या या हाणामारीचा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गोलमैदान रस्त्यावर घडलेल्या या घटनेच्या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे, की एक व्यक्ती रॉडसारखी वस्तू घेऊन जात असताना मागून आलेल्या दुसऱ्या व्यक्तीने त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला केला. हल्लेखोराने पीडित व्यक्तीला रस्त्यावर पाडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू ठेवली. यादरम्यान, पीडित व्यक्तीसोबत असलेली एक महिला धावत पुढे आली आणि हातातील बांबूने हल्लेखोराला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर हा तमाशा सुरू होताच बघ्यांची गर्दी जमली. नागरिक भीतीपोटी दूर उभे राहून हा सर्व प्रकार आपापल्या मोबाईलमध्ये चित्रित करीत होते.

कारणांबाबत अस्पष्टता
मारामारी नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हल्लेखोर आणि जखमी व्यक्ती यांच्यातील वाद कशातून उद्भवला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती उपलब्ध झालेली नाही. या घटनेची पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद झालेली नाही. व्हिडिओ पाठवणाऱ्या प्रत्यक्षदर्शी नागरिकाच्या मते, ‘क्षुल्लक वादांवरून अशा मारामारीच्या घटना रोजच्यासारख्या घडू लागल्या आहेत, लोकांचा संयम संपत चालला आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT