मुंबई

नगराध्यक्षाच्या लढतीत असलेले चारही उमेदवार कोट्यधीश

CD

चारही उमेदवार कोट्यधीश
पालघरमध्ये नगराध्यक्षपदासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नेत्यांमध्ये तगडी टक्कर!
निखिल मेस्त्री
पालघर, ता. ३० : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असताना, नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेले चारही प्रमुख उमेदवार कोट्यधीश असल्याचे त्यांच्या नामनिर्देशनपत्रातील संपत्तीच्या तपशिलावरून स्पष्ट झाले आहे. यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय विचारधारांची नसून, आर्थिकदृष्ट्या सक्षम नेत्यांमधील जोरदार टक्कर म्हणून पाहिली जात आहे.
शिवसेनेचे उत्तम घरत, भाजपचे कैलास म्हात्रे, ठाकरे गटाचे उत्तम पिंपळे आणि काँग्रेसचे प्रीतम राऊत हे चार प्रमुख उमेदवार आमनेसामने आहेत. हे सर्व उमेदवार सुशिक्षित असून, सर्वांकडे लाखो-कोटींची स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचे दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्रामध्ये दिसून येत आहे. यात बहुमजली इमारती, व्यावसायिक गाळे, शेअर बाजारातील गुंतवणूक, अत्याधुनिक वाहने आणि मोठी रोकड यांचा समावेश आहे.
संपत्तीच्या बाबतीत ठाकरे गटाचे उमेदवार उत्तम पिंपळे आघाडीवर आहेत. त्यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण घेतले असून, ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही व्यावसायिक आहेत. काँग्रेसचे सुशिक्षित उमेदवार प्रीतम राऊत संपत्तीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांनी वाडा येथील एम. एस. लॉ कॉलेजमधून वकिलीची पदवी मिळवली आहे आणि ते तसेच त्यांच्या पत्नी व्यावसायिक आहेत. शेतकरी असलेले शिवसेनेचे उत्तम घरत संपत्तीत तिसऱ्या स्थानी आहेत. सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातून पदवीधर झालेले घरत रिंगणात असून, त्यांची पत्नी नोकरी करते. संपत्तीच्या बाबतीत चौथ्या स्थानी असलेले भाजपचे कैलास म्हात्रे स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) आहेत. त्यांनी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली असून, ते व त्यांच्या पत्नी व्यावसायिक आहेत.
चारही उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करताना स्वतःची आणि आपल्या पत्नीची संपत्ती तपशीलवार नमूद केली आहे. या निवडणुकीत शिक्षणासोबतच आर्थिक बळ महत्त्वाचे ठरत असून, आता पालघरची जनता कोणत्या कोट्यधीश उमेदवाराकडे नगराध्यक्षपदाची धुरा सोपवते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपशील नाव १

- प्रीतम विश्वनाथ राऊत
वैयक्तिक जंगम संपत्ती : १,७४,१९,३३३
वैयक्तिक स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य) : १,००,००,०००
पत्नी व स्वतःची वार्षिक उत्पन्न : ६८,२१,४५०
पत्नी व स्वतःची जंगम संपत्ती : २,२६,२७,८०४
पत्नी व स्वतःची स्थावर संपत्ती : १,००,००,०००
एकूण संपत्ती : ३,२६,२७,८०४
दायित्व-देणी : १,७५,०००
२०१४ची एकूण संपत्ती : १,००,०००

- उत्तम मोरेश्वर घरत
वैयक्तिक जंगम संपत्ती : ४२,३८,७९२
वैयक्तिक स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य) : ५६,००,०००
पत्नी व स्वतःची वार्षिक उत्पन्न : १९,०७,६७०
पत्नी व स्वतःची जंगम संपत्ती : ९८,०७,३३३
पत्नी व स्वतःची स्थावर संपत्ती : १,३६,००,०००
एकूण संपत्ती : २,३४,०७,३३३
दायित्व-देणी : १,५६,०००
२०१९ची एकूण संपत्ती : १,६४,१५,९२३

- कैलास सुकऱ्या म्हात्रे
वैयक्तिक जंगम संपत्ती : ४७,९९,२५८
वैयक्तिक स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य) : ५१,७०,०००
पत्नी व स्वतःची वार्षिक उत्पन्न : १३,९५,४३०
पत्नी व स्वतःची जंगम संपत्ती : १,०१,४२,१७१
पत्नी व स्वतःची स्थावर संपत्ती : १,०४,२०,०००
एकूण संपत्ती : २,०५,६२,१७१
दायित्व-देणी : ००
२०१९ ची एकूण संपत्ती : १५,२७,९२०

- उत्तम रमेश पिंपळे
वैयक्तिक जंगम संपत्ती : ४५,५५,८५०
वैयक्तिक स्थावर संपत्ती (सध्याचे बाजारमूल्य) : ४,१७,००,०००
पत्नी व स्वतःची वार्षिक उत्पन्न : २,३४,७३०
पत्नी व स्वतःची जंगम संपत्ती : १,१४,५५,८५०
पत्नी व स्वतःची स्थावर संपत्ती : ४,९७,००,०००
एकूण संपत्ती : ६,११,५५,८५०
दायित्व-देणी : १२,४६,९३२
२०१९ची एकूण संपत्ती : २,२५,००,०००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Jalna–Jalgaon Project : जालना-जळगाव रेल्वेचा मार्ग मोकळा! ५,८०४ कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : ग्रहण काळात मंदिरे बंद ठेवण्याची पौराणिक काळापासून परंपरा, जळगावमधील शेकडो मंदिरे बंद

SCROLL FOR NEXT