मुंबई

सीसीटीव्हीने बिंग फुटले ; ट्रॉली बॅगेचे गूढ उकले

CD

पाच वर्षांच्या सहवासाचा भयाण शेवट
पंकज रोडेकर : ठाणे शहर
एकाच छताखाली, ना लग्नबंधनाचे नाते, ना लिव्ह इन रिलेशनशिप. तरीही गेली पाच वर्षे ते दोघे राहत होते, अगदी नवरा-बायकोप्रमाणे. ती प्रियांका आणि तो विनोद विश्वकर्मा वयाने तिच्यापेक्षा तब्बल ३० वर्षांनी मोठा होता. पण एका रात्रीत त्या दोघांचा संसारच पालटला. एका क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाने इतके विक्राळ रूप धारण केले, की क्षणाचाही विचार न करता विनोदने तिचे गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने तो एका ट्रॉली बॅगेत कोंबला. दोन रात्र मृतदेह त्यांच्या घरात पडून होता. दरम्यान, दुर्गंधी सुटल्याने त्याने तो खाडीत फेकला आणि निश्चिंत झाला. पण रस्त्यावरील सीसीटीव्हीने प्रत्येक क्षण कैद केला आणि त्याचे बिंग फुटले.
२४ नोव्हेंबरला दुपारीच शिळ-डायघर पोलिस ठाण्यात फोन खणाणला आणि खाडीजवळ मृतदेह असलेली ट्रॉली बॅग सापडल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पोळ त्यांचे पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्या खाडीच्या पाण्यातील मातीच्या भरावावर एक बॅग पडलेली दिसून आली. यामध्ये एका २० ते २५ वर्षीय महिलेचा मृतदेह ट्रॉली बॅगेत अर्धवट बाहेर आल्याचे दिसत होते. मृतदेहाची तपासणी करताना पोलिसांना एक अत्यंत महत्त्वाचा धागा मिळाला. तो म्हणजे मृत महिलेच्या डाव्या हाताच्या मनगटावर इंग्रजीत ‘पीव्हीएस’ असे गोंदलेले होते. हेच पीव्हीएस या खुनाचे गूढ उकलण्याचे एकमेव संकेतचिन्ह होते. गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. तातडीने चार तपास पथके तयार करण्यात आली, ज्यांचे लक्ष्य एकच होते, पीव्हीएस कोण आहे आणि तिचा मारेकरी कोण?

समाजमाध्यमांवरील माहितीद्वारे मिळाला निर्णायक साक्षीदार
कोणतेही थेट धागेदोरे नसताना समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या वार्तांद्वारे एका साक्षीदाराने थेट अप्पर पोलिस आयुक्त विनायक देशमुख यांना माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी डोळ्यात तेल घालून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आणि एका सीसीटीव्हीत मारेकरी ट्रॉली बॅग ओढताना स्पष्टपणे दिसला. पोलिसांनी त्याचा माग काढत त्याचे घर गाठले. विनोदला ताब्यात घेतल्यावर त्याने सुरुवातीला काही माहिती नाही, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याचा धीर सुटला. तो अक्षरशः पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपला गुन्हा कबूल केला. २४ तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले.

क्षुल्लक भांडण ठरले जीवघेणे
विनोद विश्वकर्मा हा मूळचा उत्तर प्रदेशचा एक नाका कामगार (बिगारी) होता. पाच वर्षांपूर्वी प्रियंकासोबत त्याची एका रेल्वेस्थानकावर ओळख झाली. त्या वेळी प्रियांका तेथे भीक मागायची. विनोदने तिला आपल्यासोबत राहण्याचे निमंत्रण दिले आणि तिने ते स्वीकारले. लग्नाशिवाय ते पाच वर्षे एकत्र राहिले, पण २१ नोव्हेंबरच्या रात्री त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि त्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर प्रियांकाचा मृतदेह ट्रॉली बॅगेत भरून घरात ठेवला. दोन रात्री बॅग घरातच ठेवली होती. परंतु मृतदेहाची दुर्गंधी सुटल्याने २३ नोव्हेंबरला विनोदने रात्री कोणीही नाही हे पाहून बॅग घरातून बाहेर काढली आणि ती खाडीत फेकून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL २०२६ शेड्यूल कधी जाहीर होणार? तारीख आली समोर; BCCI सचिवांनी मोठा ट्विस्टही सांगितला!

Mutual Fund: फेब्रुवारीत गुंतवणूकदारांचा बदलला मूड! कोणत्या फंडांमध्ये वाढली गुंतवणूक? गोल्ड ETF गुंतवणुकीत मोठा बदल

Kannad News : कन्नडमध्ये अखेर युतीचं सुत जुळलं; सुप्रिया घुगे सभापती तर माया सुराशे उपसभापती

Horoscope : मिथुन राशीत गुरु मार्गी गोचर; 11 मार्चपासून धनुसह 'या' 5 राशींसाठी शुभलाभ संयोग, धनलाभ, कामात यश अन् जीवनात मोठा बदल

मोठी बातमी : T20 World Cup विजेत्या भारतीय खेळाडूवर आयसीसीची दंडात्मक कारवाई! 'ती' चूक महागात पडली

SCROLL FOR NEXT