मुंबई

कोपरीत नागरिकांच्या तक्रारीवर २०० वाहनांवर कारवाई

CD

कोपरीत नागरिकांच्या तक्रारीवर २०० वाहनांवर कारवाई
ठाणे शहर, ता. ३० (बातमीदार) ः कोपरी वाहतूक शाखेने बेवारस, नो-पार्किंगमधील आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई करत एका महिन्यात २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांचे नागरिकांकडून वाहतूक शाखेच्या समाज माध्यमे, मोबाईल क्रमांकावर (व्हॉट्सअ‍ॅपवर) फोटो पाठवले जातात, त्या फोटोंची शहानिशा करून संबंधित वाहनावर तात्काळ कारवाई केली जाते. याप्रकारे ही मोहीम प्रभावीपणे राबवली जात आहे.
कोपरीत वाहनांची संख्या वाढत चालल्याने काही वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. कोपरीत कारवाई होत नाही, अशी नागरिकांची तक्रार नेहमीच ऐकू येत असली, तरी आता परिस्थिती पालटली आहे. दक्ष नागरिक आणि वाहतूक शाखेच्या समन्वयातून वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे.
यासाठी वाहतूक शाखेने विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. बेवारस वा चुकीच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांचा फोटो या क्रमांकावर पाठवला की, वाहतूक पोलिस तत्काळ संबंधित ठिकाणी पोहोचून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या उपक्रमामुळे कोपरीकरांना पुन्हा वाहतुकीची शिस्त लागत आहे. नागरिकांकडून या पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात अशा प्रकारे २०० वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यासाठी कोपरी हेल्पलाईन क्रमांक ७०३९००३८६६ आणि ८६५५६५४१७६ व्हॉट्सअप क्रमांक दिला असल्याची माहिती कोपरी उपवाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील यांनी दिली.

वाहतुकीची शिस्त राखण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. फोटो किंवा माहिती मिळताच आमचे पथक तत्काळ कारवाई करते. नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही सूट नाही कोपरीत स्वच्छ व सुरळीत वाहतूक ठेवणे हेच आमचे लक्ष्य आहे.
- पंकज शिरसाट, पोलिस उपायुक्त, वाहतूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT