मुसारणे शाळेत माजी विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण मेळावा
वाडा, ता. ३० (बातमीदार) ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसारणे येथे नुकताच माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि शाळेच्या भविष्यातील प्रगतीबाबत विचारमंथन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अविस्मरणीय आठवणी, अनुभव आणि शाळेबद्दलची जिव्हाळ्याची भावना मनमोकळेपणे व्यक्त केली. या वेळी सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या काही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मैत्री, स्नेह आणि शाळेबद्दलच्या निष्ठेने भरलेला हा मेळावा आनंददायी वातावरणात पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.