मुंबई

चांदीवलीत मनसे, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये टफ फाईट!

CD

चांदीवलीत मनसे, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये टफ फाईट!
प्रभाग क्रमांक १६३ मध्ये पक्षांतरामुळे मतदारांमध्ये संभ्रम
बापू सुळे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई महापालिकेच्या २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६३ मधून नगरसेवक आणि त्यानंतर दोन वेळा चांदीवली विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले दिलीप लांडे यांचे या विभागात वर्चस्व आहे. मात्र गेल्या आठ वर्षांत झालेले पक्षांतर, शिवसेनेतील फूट यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसेमधील जवळीक, काँग्रेसचेही संघटन मजबूत आहे. तसेच शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून आमदार दिलीप लांडे यांनी केलेली मोर्चेबांधणी यामुळे पालिका निवडणुकीत येथे मनसे-शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेनेत टफ फाईट होणार असल्याचे चित्र आहे.
मराठी, मुस्लिमबहुल मतदार असलेल्या या प्रभागात काजूपाडा, शास्त्रीनगर, गणेश मैदान, इंदिरानगर, घास कम्पाउंड, परेरवाडी, साकीनाका या भागांचा समावेश असून, येथे सुमारे ४६ हजार मतदार आहेत. २०१७च्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून मनसेतून दिलीप लांडे यांनी ८००९ मते घेत जवळपास १,१७५ मताधिक्याने विजय मिळवला होता, तर काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांना ६,२३४ मिळाली होती. २०१७चा विचार करता तेव्हा लांडे यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर शिवसेना आणि शिवसेना शिंदे गट असा त्यांनी प्रवास केला आहे. तर काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद शेख अद्याप अभ्यास करीत होते. मात्र मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येत असल्याने त्यांची ताकद प्रभागात वाढली असल्याचे चित्र आहे. हा प्रभाग खुल्या गटात महिलांसाठी राखीव ठेवला आहे.
दिलीप लांडे ज्या पक्षात जातील त्यांचे येथे वर्चस्व असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला ते मूळ शिवसेनेत होते, तेव्हा हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यानंतर २००५मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर ते मनसेसोबत गेले तेव्हा मनसेचा येथे दबदबा राहिला. त्यानंतर पुन्हा शिवसेनेसोबत आल्यानंतर पुन्हा शिवसेनेचा तर आता शिंदे गटासोबत असून त्यांचे वर्चस्व आहे. सातत्याने होत असलेल्या या पक्षबदलामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून महाविकस आघाडीच्या उमेदवार म्हणून वर्षा गायकवाड यांनी विजय मिळवला होता. त्यांना चांदीवली विधानसभा मतदारसंघातून एक लाख तीन हजार ९८५ मिळाली होती, तर महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ९८ हजार ६६१ एवढी मते मिळाली होती. तर विधानसभा निवडणुकीत दिलीप लांडे यांना एक लाख २४ हजार तर काँग्रेसचे नसीम खान याना एक लाख ४ हजार मते होती. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे, काँग्रेसचे मोठे आव्हान शिवसेना शिंदे गतासमोर म्हणजे दिलीप लांडे यांच्यासमोर असणार आहे.

२०१७ मधील चित्र
- दिलीप लांडे (मनसे) - ८,००९ मते
- मोहम्मद सहबुद्दीन शेख (काँग्रेस) - ६,२३४ मते
- महेंद्र साळुंखे (भाजप) - १,८८९ मते

समस्या
- विमानतळाजवळ असल्याने झोपडपट्टी पुनर्विकासावर मर्यादा
- खुल्या जागेचा अभाव
- सातत्याने वाहतूक कोंडी
- अपुरा पाणीपुरवठा
- शौचालयाची अपुरी व्यवस्था

प्रभाग क्रमांक १६३चा बहुतांश भाग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने येथील झोपडपट्टीचा पुनर्विकास होत नाही. त्यामुळे रहिवासी वर्षानुवर्षे झोपड्यातच राहत असून, त्यावर मार्ग निघायला हवा.
- अनिल गलगली,
सामाजिक कार्यकर्ते, रहिवासी

जरीमरी, काजूपाडा, साकीनाका या भागांत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असते. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्ते रुंदीकरण व्हायला हवे.
- विकास गावडे, रहिवासी

या प्रभागात बहुतांश झोपडपट्टी आहे. त्यामुळे येथे अरुंद रस्ते, अपुरा पाणीपुरवठा हा प्रश्न आहे. तसेच स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यायला हवे.
- इस्माईल शेख, व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धक्कादायक! मुंबईतील दोन नामांकित शाळांना धमकीचा मेल, संपूर्ण परिसर रिकामा

फॅमिली मॅनच्या दिग्दर्शकासोबत समंथाचं दुसरं लग्न झालं? लग्नानंतर राजच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया

Agniveer : ऊसतोड मजुरांचा मुलगा बनला ‘अग्निवीर’; गांधनवाडीचा शंकर पहिल्याच प्रयत्नात सैन्यदलात

Mahabaleshwar Politics : अधिकाऱ्यांमुळे निवडणूक लांबणीवर : कुमार शिंदे; महाबळेश्‍वरसंदर्भात याचिका दाखल करणार !

लाल शालू, केसात गजरा... अखेर सामंथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; लग्नाचे फोटो पाहिलेत का?

SCROLL FOR NEXT