मुंबई

पेण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

CD

पेण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
२ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला केईएस हायस्कूलमध्ये मतमोजणी
पेण, ता. ३० (वार्ताहर) ः आगामी पेण नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २ डिसेंबरला पार पडणार असून, ३३ हजार ८७५ मतदार आपल्या मताधिकाराचा वापर करणार आहेत. नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार तर नगरसेवकांच्या १८ जागांसाठी एकूण ४६ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात १२ प्रभागांत ४१ मतदान केंद्रे उभारण्यात येत असून, सर्व केंद्रांवर आवश्यक सुविधा, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि सुरक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.
यासोबतच राखीव पथक, उड्डाण पथक आणि पोलिस प्रशासन तैनात ठेवण्यात आले आहे. ३ डिसेंबरला पेण केईएस हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडणार असल्याने त्या ठिकाणीही निवडणूक विभागाकडून काटेकोर तयारी सुरू आहे. मतमोजणीच्या दिवशी परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, मतमोजणी प्रक्रियेसाठी स्वतंत्र कक्षांची निर्मिती पूर्ण झाली आहे.
मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, यासाठी निवडणूक प्रशासनाने यापूर्वी जनजागृती मोहीम, बाइक रॅली, पथनाट्ये यांसारख्या उपक्रमांद्वारे वातावरण निर्मिती केली. या मोहिमांमध्ये पेण प्रायव्हेट हायस्कूल, ज्युनियर कॉलेज, सार्वजनिक विद्यामंदिर, नगरपालिका शाळा तसेच पालिका कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. दुसरीकडे पोलिस प्रशासनाने शहरात रूट मार्च व दंगाकाबू प्रात्यक्षिके सादर करून शांतता आणि सुव्यवस्थेचा संदेश दिला.
.....................
लोकशाही बळकट करण्याचे आवाहन
दरम्यान, निवडणुकीदरम्यान संभाव्य गैरव्यवहार रोखण्यासाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३च्या कलम १६३ नुसार मनाई आदेश जारी केले आहेत. मतदान संपेपर्यंत निर्धारित वेळेच्या ४८ तास आधीपासून हा आदेश लागू राहणार असून, मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात संपर्क साधनांवर बंदी राहील. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी नागरिकांना शांततेत, निर्भयपणे मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Rupee Fall: भारतीय रुपया डॉलरसमोर पहिल्यांदाच ९० च्या खाली कोसळला! खरे कारण अन् परिणाम काय? जाणून घ्या सविस्तर...

IND vs SA, 2nd ODI: विराट-ऋतुराजची शतकं, तर केएल राहुलचा फिनिशिंग टच; भारताचे द. आफ्रिकेसमोर पुन्हा मोठे लक्ष्य

Navi Mumbai: पाम बीच रोडवरील ट्रॅफिकला विराम लागणार! केसर सॉलिटेअर अंडरपासला ग्रीन सिग्नल; जाणून घ्या मार्ग...

Sangli News : आटपाडीत ८०% मतदानाची ऐतिहासिक नोंद; कोणाला तारण, कोणाला घात संपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे!

Bangladesh: ''जोपर्यंत भारताचे तुकडे-तुकडे होत नाहीत, तोपर्यंत..'', बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्याचं खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT