मुंबई

उत्तनमधील मच्छीमारांचा सहकारातून एकीचा नारा

CD

भाईंदर, ता. ३० (बातमीदार) : ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील उत्तन हे मासेमारीचे मुख्य केंद्र आहे; मात्र येथील मच्छीमारांनी पकडलेली मासळी विकण्यासाठी त्यांना भाईंदर, मुंबई अथवा वसईतील नायगाव येथील घाऊक मासळी बाजारावर अवलंबून राहावे लागते. यासाठी उत्तनमधील मच्छीमारांनी स्वत:च्या हक्काचा घाऊक मासळी बाजार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तन परिसरातून साडेसातशेहून अधिक मासेमारी नौका समुद्रात मासेमारीसाठी जातात. मच्छीमारांनी पकडलेली मासळी विकण्यासाठी त्यांना वसईतील नायगाव अथवा मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला जावे लागते. सध्या भाईंदर येथील मासळी मार्केट पूर्णपणे नायगाव येथील व्यापाऱ्यांच्या ताब्यात आहे. नायगाव बाजारात व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे कोणत्याही निश्चित वेळेचे पालन केले जात नाही. व्यापारी त्यांच्या सोयीप्रमाणे बाजार सुरू करतात. वारंवार विनंती करूनही त्यांच्या मनमानीत काहीच बदल होत नाही. अनेकवेळा सर्व संस्थांनी मिळून नायगाव येथील कमिशन एजंटांशी चर्चा करून वेळ निश्चित करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यातून काहीच साध्य झाले नाही.

दुसरीकडे मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटला जाण्यासाठी महिलांना रात्री-अपरात्री निघावे लागते, तसेच टेम्पो अथवा ट्रकचे भरमसाट भाडे भरावे लागते. परिणामी, उत्तन परिसरातील मासळी विक्रेत्यांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर उत्तनमधील वाहतूक मच्छीमार संस्थेच्या संचालक मंडळाची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यात पाली उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटीचे संस्थापक बर्नड डिमेलो, माजी नगरसेविका शर्मिला बगाजी, वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष विन्सन बांड्या, उपाध्यक्ष फ्रेडी भंडारी, उत्तन जमातीचे सचिव डिक्सन डीमेकर, माजी अध्यक्ष माल्कम भंडारी, ऑस्टिन भंडारी, सिल्वा घावट्या, बस्त्याव भंडारी, उत्तन सोसायटीचे सचिव बोना मालू, नीलेश घोन्सालवीस, सारिका डुंगा आदी उपस्थित होते.

आर्थिक बचत होण्यासाठी मदत
उत्तनमधील मच्छीमारांनी नायगाव, भाईंदर आणि क्रॉफर्ड मार्केटवर अवलंबून का राहावे, उत्तनसारख्या मोठ्या मच्छीमार क्षेत्रासाठी काशीमिरा, भाईंदर किंवा फाऊंटन हॉटेल परिसरात स्वत:चा घाऊक मासळी बाजार का असू नये, असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर सर्वांनी सहमती दर्शवली. त्यानुसार उत्तनमधील सर्व संस्था आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन योग्य जागेची निवड, चर्चा व नियोजन करण्याचा त्याचप्रमाणे एक बाजार समिती स्थापन करून संघटनेच्या माध्यमातून स्वतःचा स्वतंत्र घाऊक मासळी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला.

उत्तनमधील मच्छीमारांचा स्वत:चा घाऊक मासळी बाजार स्थापन झाल्यास सध्या कमिशन म्हणून कोट्यवधी रुपये बाहेरील दलालांकडे जातात. ते पैसे स्थानिकांकडे येतील. तसेच बाजाराची वेळ आपल्याच सोयीने आणि नियमानुसार निश्चित करता येईल. वसईप्रमाणेच उत्तन परिसरातील शेकडो महिला व युवकांना रोजगार उपलब्ध होईल. ट्रक व टेम्पोचे वाहतूक भाडे कमी होईल. महिलांना रात्री-अपरात्री प्रवास करावा लागणार नाही, तसेच स्थानिक पतपेढ्या व बँकांना आर्थिक वाढीसाठी मोठा लाभ मिळेल.
- बर्नड डिमेलो, संस्थापक,
पाली-उत्तन मच्छीमार सहकारी सोसायटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ईश्वरपूर नामांतराची १७२ वर्षांची मागणी आम्ही पूर्ण करून नागरिकांच्या भावनांचा आदर केला'; प्रचारसभेत काय म्हणाले CM फडणवीस?

Beed Politics : अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला, पण धनंजय मुंडेंना परळी सुटेना! सभांना मुंडेंची दांडी, चर्चेला उधाण

Mokshada Ekadashi 2025 Donation: आज मोक्षदा एकादशी; तुमच्या राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान

Akkalkot Politics : सुधारित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ५०० कोटी; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा, 'लाडकी बहीण'बाबत काय म्हणाले...

Motivational Story : एनआयटीचा प्रवेश सोडून एनडीएमध्ये सिद्धी जैनचा ऐतिहासिक विजय; राष्ट्रपती कांस्यपदक मिळवणारी देशातील पहिली महिला

SCROLL FOR NEXT