मुंबई

डहाणूत निवडणुकीचा अंतिम टप्पा : रात्रीच्या गाठीभेटींनी रंगणार राजकीय ‘खेळ’

CD

डहाणू नगरपरिषद निवडणूक अंतिम टप्प्यात; रात्रीच्या गाठीभेटींना सुरुवात
कासा, ता. ३० (बातमीदार) : डहाणू नगर परिषदेसाठी २७ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अधिकृत प्रचार संपला असून, आता उमेदवार आणि कार्यकर्ते गुप्त बैठका, रणनीती आखणे आणि रात्रीच्या गाठीभेटींच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहेत. प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त आणि संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात केली आहेत.
नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार भरत राजपूत यांनी “डहाणूत सर्व जागांवर आम्ही विजय मिळवू,” असा दावा केला आहे. तर शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि इतर पक्षांच्या एकत्रित आघाडीचे नेते मिहीर शाह यांनी “दहा ते पंधरा जागांवर आमचा विजय निश्चित,” असा विश्वास व्यक्त केला आहे. या निवडणुकीत प्रचारसभांमधील टीका-प्रत्युत्तरांनीही रंग भरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या ‘अहंकारा’वर टीका केली होती, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “लंका आम्ही जाळू आणि विकास करू,” अशा शब्दांत प्रतिउत्तर देत वातावरण तापवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New ST Buses Decision : सतेज पाटलांनी मागणी करताच राज्य सरकार नवीन आठ हजार एसटी बसेसची खरेदी करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Women Cricket: क्रिकेटमधील महिलांचा उत्साह दुपटीने वाढला; भारतातील १४ राज्यांचा सर्व्हे, युवा खेळाडूंची पावले सरसावली

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

SCROLL FOR NEXT