विरार, ता. ३० (बातमीदार) : पश्चिम किनारपट्टीवर उत्तन ते झाई यादरम्यान मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समुदाय वसलेला आहे. त्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे नाताळ. या सणाच्या पार्श्वभूमीवर आगमनाच्या प्रतिक्षा काळात पहिल्या रविवारी नाताळ सणाची पहिली मेणबत्ती आज (ता. ३०) वसईतील चर्चमध्ये प्रकाशमान झाली. वसई धर्मप्रांतातील सर्व चर्चमध्ये एकाच वेळी सर्व मेणबत्तीपैकी पहिली मेणबत्ती फादर आसिस रॉड्रिक्स यांनी आपल्या पौरोहित्याद्वारे ही पवित्र मेणबत्ती माणिकपूर येथील सेंट मायकल चर्चमध्ये प्रज्वलित करून नाताळ जवळ येत आहे, याची प्रचिती करून दिली.
नाताळ या पवित्र सणासाठी चार आठवडे शिल्लक आहेत. नेमके हेच चार आठवडे म्हणजे चार पवित्र रविवारांना ख्रिस्ती परंपरेत एक आगळे-वेगळे महत्त्व आहे. त्यांनाच ख्रिस्ती धर्मियांमध्ये आगमन काळ अर्थात प्रतिक्षा काळ असेही आवर्जून म्हटले जाते. नाताळ सणाच्या आधी येणाऱ्या चार प्रत्येक पवित्र रविवारांना एक वेगळे धार्मिक महत्त्व आहे. त्यानुसार रविवारपासून वसईतील सर्व चर्चमध्ये नाताळची पहिली मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली आहे.
वसई धर्मप्रांतात नाताळ सुरू होण्याच्या चार आठवडे आधीच म्हणजेच पवित्र नाताळ आगमन काळ विधी प्रत्येक चर्चमध्ये विधीपूर्व साजरा केला जातो. प्रभू येशूला लहान मुले आवडतात आणि अगदी चर्चमधील फादर यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुला-मुलींनी मेणबत्तीच्या साक्षीने ते ज्योत लावून या आगमन काळाचे स्वागत करतात, अशी माहिती धर्मगुरू फादर आसिस रॉडरिक्स यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.