मुंबई

दिवाळेतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

CD

दिवाळेतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य
हद्दीच्या वादामुळे पालिकेचे दुर्लक्ष; स्थानिक कोळीबांधव त्रस्त
तुर्भे, ता. ३० (बातमीदार) ः ‘स्मार्ट व्हिलेज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळे कोळीवाड्यातील फगवाले मच्छीमार संस्थेच्या परिसरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळेस रस्त्याचा वापर करणाऱ्या कोळीबांधवांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हद्दीच्या वादामुळे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.
‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्पांतर्गत गावातील रस्ते काँक्रीटचे करण्यात आले आहेत. तसेच पार्किंग आणि इतर सोयीसुविधायुक्त कामे आजवर पार पाडली गेली आहेत. मात्र फगवाले मच्छीमार संस्था ते साईबाबा मंदिर या मार्गावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पालिका प्रशासनाला माहिती दिली असता, हा परिसर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या हद्दीत असल्यामुळे अद्याप दुरुस्तीला प्राधान्य दिलेले नाही, असे स्थानिकांनी सांगितले. दक्षिणेकडे समुद्रकिनारा असल्यामुळे दिवाळे कोळीवाड्यातील रहिवासी, विशेषतः मच्छीमार रात्री व अपरात्री रस्त्यावर ये-जा करतात. या काळात पथदिवे बंद असल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेणे कठीण जाते आणि अपघाताची शक्यता वाढते. यामुळे स्थानिक मच्छीमारांनी तत्काळ रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. दिवाळे मच्छीमार जेट्टीकडे जाणारा हा रस्ता पर्यायी असून, लोकांची गर्दी असते. पावसामुळे हा रस्ता संपूर्ण खड्डेमय झाल्याने कोळीबांधवांना गंभीर त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. स्थानिकांनी याबाबत पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असे वेताळेश्वर मंदिर अध्यक्ष सुरेश बाये यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : गॅस दरवाढीवरून रिक्षाचालकांचा संताप, गॅस पंपाला घेराव

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT