मुंबई

नावांपुढे फुली मारल्यानंतरही बोगस मतदानाची भीती

CD

नावांपुढे फुली मारल्यानंतरही बोगस मतदानाची भीती
बेलापूरसह ऐरोली विधानसभेत अनेक नावे सापडली
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३० : नवी मुंबई महापालिका हद्दीतील मतदार याद्यांमध्ये असणारी दुबार नावे रद्द करण्यास निवडणूक विभागाने सुरुवात केली आहे. मात्र ही नावे यादीतून काढली जाणार नसून, त्या नावांपुढे दोन फुल्या मारल्या जाणार आहेत. त्यामुळे मतदार यादीत ही नावे राहिल्याने त्यावर बोगस मतदान होण्याची भीती राजकीय पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वापरलेली मतदार यादी पुन्‍हा वापरण्यात येणार आहे. नवी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी हा प्रश्न सरकार दरबारी लावून धरला आहे. काँग्रेसने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या यादीनुसार बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत एकूण ७६ हजार दुबार नावे असल्याचा दावा केला आहे. त्यापैकी ऐरोली विधानसभा मतदारसंघात ४१ हजार ५५६ दुबार नावे आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात ३५ हजारांच्या आसपास दुबार नावे आहेत. मनसेतर्फेही शहराध्यक्ष गजानन काळे यांनी निवडणूक विभागाकडे दुबार आणि पत्ते नसलेल्या ४५ हजारांपेक्षा अधिक नावांची यादी निवडणूक आयोगाकडे दिली आहे. या नावांची तपासणी करून नावे रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परंतु महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या यादीत या दुबार नावांचा समावेश असणार आहे. आयोगाने महापालिकेला पडताळण्यात आलेल्या दोन नावे, पत्ते नसलेली नावे अशांसमोर फुल्या मारण्याचा सल्ला दिला आहे. परंतु ही नावे यादीत राहिल्याने बोगस मतदानाची भीती उमेदवारांच्या मनात राहणार आहे.
-------------------------------
दोन्ही मतदारसंघांत दुबार नावे आढळली
बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही मतदारसंघांत दिलेल्या तक्रारीनंतर दुबार नावे सापडण्यास सुरुवात झाली आहे. बेलापूर मतदारसंघात चार हजारांपेक्षा तर ऐरोलीमध्ये ४,५०० पेक्षा अधिक दुबार नावे निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना सापडल्याचे समजते आहे. या नावांपुढे फुली मारली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT