मुंबई

मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्‍पसचे उद्‌घाटन

CD

मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्‍पसचे उद्‌घाटन
खासदार पीयूष गोयल यांची उपस्‍थिती
मुंबई, ता. ३० : उत्तर मुंबईतील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि सर्वांगीण शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका शिक्षण विभागाच्या आर उत्तर विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या मुंबई पब्लिक स्कूल, मंडपेश्वर कॅम्पसचे (कांदिवली पूर्व) उद्‌घाटन आज (ता. ३०) उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले.
या नवीन शाळेत आधुनिक वर्गखोल्या, तंत्रज्ञानसक्षम शिक्षण प्रणाली, क्रीडा सुविधा आणि मूल्याधारित उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुलींचा सन्मान आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी मुंबईतील सर्व पालिका शाळांमधील सुमारे ६०,००० विद्यार्थिनींना दरमहा ४,२०,००० सॅनिटरी पॅड मोफत वितरित केले जातील, अशी घोषणा या वेळी केंद्रीय मंत्री गोयल यांनी केली.
उद्‌घाटन कार्यक्रमाला पालक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधींनी उत्साहपूर्ण हजेरी लावली. गोयल यांनी पालिकेच्या शिक्षण विभागाचे कौतुक केले. त्‍यांनी विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅडचे वाटप करून शाळांमधील स्वच्छता आणि आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले. २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुलं आणि मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली. यामुळे सार्वजनिक आरोग्य आणि सामाजिक कल्याणात ऐतिहासिक बदल घडला, असे त्‍यांनी सांगितले.
स्‍वच्छतेबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी
‘पॅडमॅन’ आणि ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटांचे प्रदर्शन करण्याचे आवाहन त्‍यांनी शिक्षण विभागाला केले. उत्तर मुंबईला शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य केंद्र बनवण्यासाठी शैक्षणिक उपक्रम दरवर्षी अधिक विस्तारले जातील, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली.

१२ कोटींहून अधिक शौचालयांचे बांधकाम
गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रव्यापी मोहिमेचा उल्लेख केला. देशातील शाळांमध्ये स्वतंत्र शौचालये बांधण्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. २५ लाख कोटींच्या ऐतिहासिक गुंतवणुकीतून १२ कोटींहून अधिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्याचबरोबर चार कोटी पक्की घरे गरीब कुटुंबांना मोफत देण्यात आली. त्यात स्वच्छतागृह, स्वयंपाकघर आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत, असे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

Chandra Grahan: गरोदर महिलांवर ग्रहणाचा खरंच दुष्परिणाम होतो का? अंनिसने केला खुलासा; वाचा सत्य काय...

SCROLL FOR NEXT