मुंबई

सहा प्रभागांच्या स्थगित निवडणुकांवर उमेदवारांचा संताप

CD

स्थगितीमुळे बदलापूरमध्ये संताप
सहा प्रभागांतील उमेदवारांचा आयोगाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
बदलापूर, ता. ३० (बातमीदार) ः पालिकेच्या सहा प्रभागांची निवडणूक स्थगित झाली आहे. प्रभाग क्रमांक ५(ब), १५(ब), १७ (अ), १०(ब), ८(अ) या पाच जागांवर आता शनिवारी (ता. २०) मतदान होणार आहे. दरम्यान, या प्रभागांतील उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ घातला.
गेल्या अनेक दिवसांपासून उत्साहात प्रचार करणारे उमेदवार अचानक स्थगितीने हैराण झाले आहेत. हा लोकशाहीला घातक निर्णय, आमच्या नेतृत्वाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याच्या आरोपांसह उमेदवारांनी आयोगावर नाराजी व्यक्त केली. स्थगितीमुळे मतदारांमध्येही मोठा संभ्रम निर्माण होणार असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.
---
संभ्रम वाढला
या उमेदवारांकडून आयोगाला अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत; परंतु निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी या प्रश्नांची उत्तरे न्यायालयाच्या अखत्यारित आहेत. आम्ही सध्या काही सांगू शकत नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम वाढला आहे. प्रभाग १०(ब) मधील उमेदवार दक्षता तांबे यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले, की आम्ही मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत प्रचार केला. आता अचानक काय करावे? २ डिसेंबरचे मतदान आणि २० तारखेची परिस्थिती कशी असेल, हा मोठा प्रश्न आहे. परिणामी, पालिकेची सत्ता कोणाच्या हातात जाणार, हेही सर्वांसाठी सध्या एक मोठे अनुत्तरित कोडे बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT