वसईतील वाहतुककोंडी फुटणार!
खाडी व उड्डाणपूलाचा मार्ग प्रवाशांसाठी ठरणार; अधिकाऱ्यांकडून पाहणी
वसई, ता. १ (बातमीदार) : वसई पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू असून, हा पूल थेट खाडीला जोडण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार असून, वसईतील वाहतूक कोंडीची मोठी समस्या दूर होण्यास मदत मिळेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील बदल आणि नव्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी रेल्वे, पालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी नुकतीच पाहणी केली.
वसई पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या जुन्या पुलाच्या बांधकामावेळी उतरण रस्त्याचा पर्याय आणि पूर्वी पेट्रोल पंपाजवळ असलेला उतरण रस्ता रद्द करण्यात आला आहे. यामुळे नवघर औद्योगिक वसाहतीमधील नागरिक, कामगार आणि कारखानदारांना वाहतूक अडथळे आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी माजी महापौर नारायण मानकर यांनी प्रशासनाकडे पत्रव्यवहार आणि चर्चा करून पश्चिम भागातून पूर्वेला जाण्यासाठी सिग्नलच्या अलीकडे मोठी जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी पुलाची उतरण दिल्यास पश्चिम-पूर्व मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल आणि कोंडी फुटेल, यावर गांभीर्याने विचार करण्याची मागणी केली आहे. वसई इंडस्ट्रीयल असोसिएशननेही यासंदर्भात प्रशासनाला पत्र दिले आहे.
उड्डाणपूल आणि वाहतुकीच्या समस्या तसेच उपाययोजनांची संयुक्तरित्या पाहणी करण्यासाठी रेल्वेचे अधिकारी मनीष पटेल आणि अभियंता देवराज बॅनर्जी, पालिका अधिकारी, माजी महापौर नारायण मानकर, विनायक निकम, प्रकाश रॉड्रिग्ज, वृन्देश पाटील, राजाराम बाबर, उदय चेंदवणकर, वसई इंडस्ट्री असोसिएशन, नवघरचे अध्यक्ष अनिल अंबर्डेकर, फ्रान्सिस फर्नांडिस आणि प्रशांत बागर उपस्थित होते.
--------------
औद्योगिक क्षेत्रासाठी दिलासा
मागील अनेक दशकांपासून हजारो कामगारांना रोजगार देणाऱ्या वसई (पूर्व) येथील नवघर औद्योगिक नगरीला वाहतूक समस्येमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक उद्योजक वसईतून गुजरातकडे स्थलांतरित होत आहेत, ही चिंताजनक बाब आहे. सिग्नलच्या अलीकडे असलेल्या जागेत पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी रस्ता बनवल्यास नवघर वसाहतीतील नागरिक, कामगार आणि कारखानदारांना सोयीचे होऊन, कोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल, असे मत असोसिएशनने मांडले.
--------------
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
खाडीवरचा पूल : ३६ मीटर लांब
जुना उड्डाणपूल : दीड मीटर उंच
पश्चिम ते पूर्व सर्कलमुळे मार्ग सुरळीत
पालिकेच्या खर्चात बचत
खाडीवरचा पूल रेल्वेकडून
खाडीची स्वच्छता होणार
पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होणार
--------------
नवघर औद्योगिक वसाहतीतील नागरिक, कामगार व कारखानदार आदींना उड्डाणपूल व पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्यास वाहतूक अडथळे, विलंब आणि गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही यासंदर्भात रेल्वे व पालिकेत पाठपुरावा व उपायोजना बाबत पाहणी केली
- नारायण मानकर, माजी महापौर
--------------
वसई पूर्वेला मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत आहे येथे येणाऱ्या कामगारांना तसेच वाहनांना कोंडीचा सामना करावा लागत आहे रेल्वे उड्डाणपूल काम सुरु आहे यात नवे पर्याय मार्ग निवडून कोंडी फोडण्यासाठी उपायोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली.
- अनिल अंबर्डेकर, अध्यक्ष, वसई इंडस्ट्री असोशिएशन, नवघर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.