मुंबई

नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये टिटवाळ्याची जोरदार चमक

CD

राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये टिटवाळ्याची पोरं चमकली
अजिंक्यला कांस्य, तर अस्मिता इंगळेला सुवर्ण
टिटवाळा, ता. १ (वार्ताहर) ः राष्ट्रीय कराटे स्पर्धेत टिटवाळ्याच्या दोन विद्यार्थ्यांनी दमदार छाप उमटवली आहे. रेजेन्सी सर्वमचे रहिवासी आणि मेरिडियन शाळेचे विद्यार्थी अजिंक्य इंगळे आणि अस्मिता इंगळे यांनी चमकदार कामगिरी केली आहे. अकराव्या ओपन नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये इंगळे भावंडांनी उल्लेखनीय यश मिळवत शाळा आणि शहराचा मान उंचावला.
किमुरा शुकोकाई कराटे असोसिएशन इंडिया, कराटे इंडिया ऑर्गनायजेशन आणि किमुरा शुकोकाई इंटरनॅशनल यूके यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा रविवारी (ता. ३०) कल्याण मंडप कम्युनिटी हॉल येथे पार पडली. या स्पर्धेत देशभरातील तब्बल साडेचारशेहून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता.
अजिंक्य इंगळेने कुमिते गटात आक्रमकता आणि संतुलित बचावाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्यपदक आपल्या नावावर केले. काता प्रकारातही त्याने प्रभावी फॉर्म दाखवत कांस्यपदक पटकावले, तर अस्मिता इंगळेने काता प्रकारात नेत्रदीपक अचूकता, वेग आणि शैली यांचे परिपूर्ण मिश्रण साधत सुवर्णपदक पटकावले. कुमितेत प्रभावी जोशाने लढत कांस्यपदक मिळवले. या स्पर्धेतही भावंडांनी दाखवलेली तांत्रिक प्रवीणता, शिस्तबद्ध खेळ आणि निर्भीडता विशेष दाद मिळवून गेली.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून काटेकोर प्रशिक्षण घेतले असून, त्याचे फलित या राष्ट्रीय पातळीवरील यशातून स्पष्ट दिसून येत आहे. टिटवाळा शहरातील नागरिक, त्यांच्या शाळेचे शिक्षकवर्ग आणि स्थानिक क्रीडाप्रेमींनी या भावंडांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या जिद्दीमुळे आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच या पदकांची माळ त्यांनी गळ्यात घातल्याचे सर्वांनी गौरवपूर्ण शब्दांत सांगितले. अनेकांनी हे यश टिटवाळा आणि मेरिडियन स्कूलसाठी अभिमानास्पद ठरत असल्याचे मत व्यक्त केले.
या दोघांच्या कामगिरीने परिसरातील इतर विद्यार्थ्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले असून, कराटे आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. अजिंक्य आणि अस्मिता ही भावंडे भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय पातळीपलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदके जिंकतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या या यशाने टिटवाळा शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक क्रीडा क्षेत्रासाठी हा एक प्रेरणादायी क्षण ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाटक सुरु असताना अस्ताद काळे प्रेक्षकावर का भडकला? नाटक मध्येच थांबवून चांगलंच सुनावलं

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Sambhajinagar News: सिल्लोडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर; महसूल पथकाने हॉटेलवर कारवाई केली

SCROLL FOR NEXT